पुणे : मागच्या काही वर्षात इस्रायलने कृषी क्षेत्रात प्रचंड मजल मारली आहे. पाणी आणि जमीन कमी असताना आज इस्रायल फळे, भाज्या यांची निर्यात करतो. इस्रायलमधील एक कंपनीने शेतकऱ्यांसाठी असे एक सॉफ्टवेअर तयार केले त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना किती प्रमाणात, केव्हा पाणी द्यायचे हे लक्षात येते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन शेतीतील उत्पादन वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. इस्रायलमधील मन्ना इरिगेशनने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या त्यांनी आतापर्यंत ५० पिकांवर हा प्रयोग यश्वी करून दाखवला आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता १०% ने वाढली असल्याचा कंपनीने दावा केला आहे.
नेमकं हे सॉफ्टवेअर कसे काम करते हे आपण पाहूया. हे सॉफ्टवेअर असून उपग्रहाद्वारे म्हणजेच सॅटेलाईटद्वारे मिळालेली माहिती, त्या भागातील हवामान, स्थानिक हवामान याद्वारे पिकाचा अभ्यास करते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पिकाची आताची परिस्थिती, पिकाचा जोम, पाण्याची गरज याचा अभ्यास केला जातो. स्थानिक हवामान केंद्राच्या माध्यमातून सर्व माहिती गोळा केली जाते. ती माहिती, मातीची स्थिती, आणि त्या पिकाला देण्यात करण्यात येणारे सिंचन ( उदा. तुषार, ठिबक) यांच्याशी जुळवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी किती पाणी लागणार केव्हा पाणी लागणार यांची माहिती कळते.
या सॉफ्टवेअरचे फायदे
१) पिकांना नेमके केव्हा आणि कधी पाणी लागणार याची माहिती कळते.
२) उपग्रहाच्या माध्यमातून नियमित फोतो येत असल्याने पिकांची परिस्थिती कळणार
३) यामुळे पाण्याची बचत होऊन, पिकाची उत्पादनक्षमता वाढते.
४) वातावरण बदल आणि पाण्याची कमतरता यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन शेती करण्याच्या पदतीना चालना मिळते.
Share your comments