1. बातम्या

पावसाचे रुद्र रूप: ईशान्य भारतात पावसामुळे भूस्खलन होऊन 50 लोक बेपत्ता अन14 मृतदेह आढळले, पावसाचा महाराष्ट्राला चकवा

ईशान्य भारतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून गुरुवारी पहाटे इंफाळ पासून असलेल्या तीस किलोमीटर वरील नोनी जिल्ह्यात भीषण स्वरूपात भूस्खलन होऊन त्यामध्ये 64 लोक ढिगार्याखाली दाबले गेल्याची माहिती असून 14 लोकांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत काढण्यात आले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
heavy rainfall in assam

heavy rainfall in assam

 ईशान्य भारतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून गुरुवारी पहाटे इंफाळ पासून असलेल्या तीस किलोमीटर वरील नोनी जिल्ह्यात भीषण स्वरूपात भूस्खलन होऊन त्यामध्ये 64 लोक ढिगार्‍याखाली दाबले गेल्याची माहिती असून 14 लोकांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत काढण्यात आले.

भितीदायक म्हणजे अजूनही 50 जण ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. यामध्ये  काही टेरिटोरियल आर्मीच्या जवानांचा देखील समावेश आहे.

याबाबत स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी रेल्वेचे काम सुरू असून जवळच टेरिटोरियल आर्मी कॅम्प होता. हा कॅम्प  देखील झालेल्या या भूस्खलनामुळे उध्वस्त झाला. यासोबतच रेल्वे रुळाचे काम करणारे मजूर ढिगाऱ्याखाली  दबले गेले.

बचाव पथकाने गुरुवारी रात्रीपर्यंत ढिगाऱ्याखाली शोध घेतला परंतु यश मिळू शकले नाही. तसेच आसाम राज्यातही गुरुवारी पुरात बारा लोकांचा मृत्यू झाला तसेच गेल्या दहा दिवसात पावसामुळे घडलेल्या घटनांमध्ये दीडशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.हीच परिस्थिती मेघालयात देखील आहे.

नक्की वाचा:Maharashtra Mansoon News: येणाऱ्या 48 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

 महाराष्ट्राला दिला पावसाने चकवा

 जर या तुलनेत महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 27 जून ते सहा जुलै या दहा दिवसांच्या दरम्यान राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे

परंतु अनुकूल वातावरणाचा सकारात्मक प्रभाव कमी झाल्याने आगामी चार ते पाच दिवस पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडण्याची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे

नक्की वाचा:वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी

 पाऊस केरळमध्ये देखील रुसला

 वेळेच्या आधी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले व पाऊसही सुरू आहे परंतु एका महिन्यात ज्या प्रमाणात पाऊस व्हायला हवा होता त्याचा निंम्मादेखील  पाऊस केरळमध्ये झालेला नाही. 

जर आपण केरळ मधील एक जून ते 29 जून दरम्यान ची सरासरी पाहिले तर 622 मिमी पाऊस होतो. तर यावर्षी निम्म्यापेक्षा कमी म्हणजे फक्त 292 मिमी पावसाची नोंद झाली.

म्हणजे जवळजवळ 53 टक्क्यांनी ही सरासरी कमी आहे. यामध्ये विशेष म्हणजे दहा वर्षातला हा सर्वात कमी पाऊस आहे.

नक्की वाचा:Maharashtra Mansoon News: येणाऱ्या 48 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

English Summary: in imphal land slide incidient occurs so fourteen people dead Published on: 01 July 2022, 11:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters