1. बातम्या

पाच रुपयात तुम्ही होणार लखपती, जाणून घ्या काय आहे नाण्यात खास बात

पाच रुपयांचे जुने नाणे

पाच रुपयांचे जुने नाणे

मुंबई: रुपयांचे नाण तुम्हाला लखपती बनवणार असं हेडिग वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल असं कधी होईल का? पण असं होत आहे. जर काही खराब नाणी तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत बनवू शकतील तर हे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. पण सध्याच्या दिवसांमध्ये अनेक वेबसाईट्सवर जुन्या नोटा, नाणी खरेदी-विक्रीचा वेगाने केली जात आहे.

तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की अशी नाणी आणि नोटा खरेदी करण्यात अनेक जणांना इंटरेस्ट असतो, ज्यांच्या छपाईमध्ये चूक झाली आहे. या नाण्यांना एरर कॉईन अथवा नोट्सना एरर नोट्स असे म्हटले जाते.ई कॉमर्स साईट Quickr वर महाराणी विक्टोरियाच्या वर्षाच्या म्हणजेच १८६२च्या सालच्या नाण्याची विक्री होत आहे. या वेबसाईटवर ही नाणी १.५ लाख रूपयांपर्यत विकली जात आहेत. १८६२ साली बनलेला चांदीचे दुर्मिळ नाणे या श्रेणीमध्ये येते.

 

यातून तुम्ही १.५ लाख रूपये कमवू शकता. आत तुम्हाल पाच रुपयांच्या नाण्यामध्ये काय इतके पैसे येतील का ? पण या नाण्याचे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे यात दोन वेळा ५ हा अंक छापलेला आहे. नाण्यांचे कलेक्शन करण्याचा छंद असलेल्या लोकांसाठी हे नाणे खास आहे त्यामुळे असे लोक या नाण्यासाठी हजारो रूपये देण्यास तयार असतात. जर तुमच्याकडे अशी दुर्लभ नाणी आहेत आणि ती तुम्हाला विकायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला साईटवर ऑनलाईन विक्रेता म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागेल.

 

नाण्याचा फोटो काढा आणि या साईटवर अपलोड करा. जर तुम्ही नशीबवान असाल तर खरेदी करणारी व्यक्ती तुमच्याशी संपर्क करेल. क्लिक इंडिया साईटवर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही हे डायरेक्ट विकण्यासाठी लिंक मिळेल. यावर तुम्ही विक्रेता म्हणून रजिस्टर करून तुमच्याकडील नोटा विकू शकता.दरम्यान एका वेबसाईटवर पाच रुपयांच्या नाण्याची किंमत ४५०० रूपये इतकी लावण्यात आली आहे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters