भारतात कांद्याची लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र हा कांदा लागवडीत देशात अव्वल आहे. येथील विशेषता नाशिक जिल्हा हा कांदा लागवडीसाठी ओळखला जातो. महाराष्ट्रातील खान्देश, पश्चिम महाराष्ट्र व इतरहि काही भागात कांद्याचे उत्पादन हे घेतले जाते, पण पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा कांदा लागवडीत एक वेगळे स्थान ठेवतो आणि हेच कारण आहे की नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठे कांद्याचे मार्केट आहे.
सध्या कांद्याचे भाव हे पिंपळगाव मार्केट वगळता सर्वीकडे चांगलेच उतरले आहेत. पिंपळगाव येथे 13 तारखेला कमाल भाव हा 4300 रुपये क्विंटल एवढा होता आणि किमान भाव हा 1600 एवढा होता. तर लासलगाव मार्केटला कांदा हा खुपच कमी भावात विकला जातो आहे. 13 तारखेलाच लासलगाव येथे कमाल भाव हा 2575 तर किमान भाव हा 900 एवढा कमी होता. असा अंदाज वर्तवला जात आहे की, एवढ्या आठवड्यात आगात लावलेला लाल कांदा हा मार्केट मध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे कांद्याचे भाव हे अजून पडतील की काय असा धाक आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.कांदा उत्पादक शेतकरी सांगतात की, पिंपळगाव कांदा मार्केट मध्ये नेहमीच कांद्याला चांगला भाव मिळतो आणि याचे विशेष कारण देखील आहे. पिंपळगाव मार्केट मध्ये कांदा हा चांगल्या क्वालिटीचा येतो आणि त्यामुळे येथील कांदा हा विशेषता बियाणे तयार करण्यासाठी खरेदी केला जातो. त्यामुळे येथील कांद्याला हा इतर मार्केटपेक्षा अधिक भाव हा मिळतो. त्यामुळे जर कांद्याचा भावाचा अंदाज लावायचा असेल तर पिंपळगाव मार्केट पेक्षा लासलगाव मार्केटवरून कांद्याच्या भावाचा अंदाज लावला पाहिजे असे देखील शेतकरी नमूद करतात
कांद्याचे बाजार का पडलेत
महाराष्ट्रात सद्धया कांद्याला खुपच कमी बाजारभाव मिळत आहे आणि याचे कारण असे की मार्केट मध्ये सद्ध्या कांद्याची आवक हि प्रचंड वाढली आहे. दिवाळीला मार्केट हे दहा दिवस बंद राहिले आणि त्यामुळे आता कांद्याच्या आवकमध्ये प्रचंड वाढली आणि भाव हे चांगलेच कोसळलेत. अनेक कांदा उत्पादक शेतकरी सध्या आपला सोन्यासारखा कांदा हा नाईलाजाने 1000 ते 2000 च्या दरम्यान विकत आहेत. आणि असे सांगितले जाते की, कांदा लागवडीसाठी 17 रुपये किलो खर्च हा शेतकरी बांधवाना येतो, त्यामुळे एवढ्या कमी भावात शेतकऱ्यांना कांदा हा परवडूच शकत नाही. कांद्याला किमान 3500 ते 4000 रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांना कांदा लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल.
लाल कांद्यामुळे भाव padtilकाय देईल
शेतकरी मित्रांनो असे सांगितलं जात आहे की, एवढ्या आठवड्याच्या आत-बाहेर खरीप हंगामातील आगात कांदा म्हणजेच आगात लाल कांदा हा बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे पडतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी जवळपास 65 टक्के उत्पादन हे रब्बी हंगामात घेतले जाते. सुरुवातीच्या म्हणजेच खरीप हंगामात फक्त 15 टक्के कांद्याचे उत्पादन हे होते. आणि आता खरीपचा कांदा म्हणजे लाल कांदा हा बाजारात एन्ट्री मारणार आहे. त्यामुळे भावात घसरण हि नक्कीच होईल पण पाहिजे तेवढी घसरण हि होणार नाही. येणाऱ्या पावसाळी म्हणजेच लाल कांद्याच्या आगमनाने भाव जरी पडला नाही तरी आता जो बाजारभाव मिळत आहे तो शेतकऱ्यांना तोटा देणाराच आहे असे शेतकरी आपले मत व्यक्त करीत आहेत.
Share your comments