1. बातम्या

शेतकरी बंधूंनो घाई करू नका जरा थांबा! कांदा हसवणार तज्ञांच्या आव्हान

onion

onion

नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलान, देवळा, कळवण, सटाणा या भागात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तसेच लगतच्या धुळे आणि साक्री परिसरात देखील कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. परंतु यावर्षी कांदा खराब होण्याचे प्रमाण इतर वर्षांपेक्षा जास्त आहे

.या परिसरात झालेल्या पावसामुळे लाल कांद्याची रोपे आणि नवीन लागवड झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यासारखेच परिस्थिती मध्य प्रदेश, दक्षिण भारत आणि राजस्थान राज्यात झालेली आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठा चा निर्देशांक पाहता महिनाभर पुरेल इतका मालशिल्लक असताना दोन ते तीन महिन्याची मागणी भागवावी लागणार असल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाववाढ हमखास होण्याची स्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा पाच हजाराचा टप्पा पार करेल अशा पद्धतीचे आशादायक चित्र आहे.

जर मार्केटचा विचार केला तर कांद्याच्या भावात मागील आठवड्यापासून दररोज एक ते दोन रुपयांनी वाढ होत आहे. कांद्याच्या भावात अचानक भाव वाढ होण्या पेक्षा दररोज एक ते दोन रुपयांनी होणारी भाववाढ  टिकणारी असते. त्यामुळे कांद्याचे दर आगामी काळात तेजीत राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

 देवळा बाजारपेठेत मुहूर्ताचा लाल कांद्याला मिळाला 3131 रुपयाचा भाव

चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील शेतकऱ्यांचा लाल कांदा दोन आठवडे अगोदरच देवळा येथील बाजारात दाखल झालाआहे. मुहूर्ताच्या कांदा म्हणून यांची खरेदी करण्यात आली व या कांद्याला 3131 रुपये दर मिळाला आहे.

चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील कौतिक जाधव  यांनी त्यांच्या दोन एकरमध्ये उत्पादित केलेल्या पंचवीस क्विंटल 40 किलो कांद्याला 3131 रुपयांचा भाव मिळून या कांद्यातून जाधव यांना 78 हजार रुपये पदरी पडले आहेत. परंतु हा मुहूर्ताचा दर आहे परंतु चांगल्या प्रतीच्या कांद्याला भाव कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ( माहिती – हॅलो कृषी )

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters