चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी यांच्यात जुने आणि नवे असा संघर्ष निर्माण झाल्याने त्यांच्या संघर्षात शेतकरी वेठीस धरले गेले.
तसेच यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता लिलावातून निघून गेलेल्या सुमारे 50 ते 70 जुनी व्यापाऱ्यांचे परवाने तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले व सोबतच लिलाव बंद ठेवून सोमवार नंतर जुन्या नव्या व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय व्यापारांत समवेत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी दिली.
काय आहे नेमके प्रकरण?
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू असताना जुना आणि नवा असा संघर्ष झाल्याने काही व्यापाऱ्यांनी दिला प्रक्रियेतून काढता पाय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाहक त्रास सहन करावा लागेल अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने काल जुने व्यापारात सोबत बैठक घेतली व त्यामध्ये जुने व्यापाऱ्यांनी नवीन व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या माल खरेदीस विरोध दर्शवला.
मात्र मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली असल्याने लीलावपूर्ण करून त्यानंतर पुन्हा एकत्रित बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. त्यावेळेपर्यंत लिलावाच्या सकाळच्या सत्रात बाजार समितीत वीस ते पंचवीस नवीन व्यापाऱ्यांनी सुमारे दोनशे वाहनातून आलेल्या कांद्याचे लिलाव केलेला होता. लिलावाच्या दुपारच्या सत्रात मात्र जून्या व्यापाऱ्यांनी सहभाग घेऊन उर्वरित लिलाव करून घेतले. त्यानंतर एकत्रित बैठक होऊन त्यात शेतकऱ्यांनी दोन्ही व्यापारी प्रक्रियेत हवेत त्याशिवाय स्पर्धा निर्माण होणार नाही अशा प्रकारचे मत मांडले.
अक्षर या झालेल्या बैठकीत सोमवारपासून सर्वांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र तीन दिवसापासून शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप झाल्याने व बाजार समितीला कुठलीही पूर्वकल्पना न देता लिलावातून काढता पाय घेतल्याने बाजार समितीने जुन्या व्यापाऱ्यांचे परवाने तीन दिवसांसाठी निलंबित करण्याच्या नोटिसा देण्याचा तसेच बाजार समिती आवक मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने बाजार समिती कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Share your comments