चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सोयाबीनचे नवीन वाण शोधले असून या वानाला दिल्लीमधील वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर रित्या मान्यता दिलेली आहे.या शेतकऱ्याचे नाव आहे सुरेश गरमळे असून ते वायगाव वायगाव भोयर येथे राहतात.
याबाबतची माहिती अशी की बारा वर्षापूर्वी त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या सोयाबीन मध्ये दोन वेगवेगळ्या गुणधर्माच्या दोन प्रकारच्या वनस्पती आढळल्या होत्या त्यानंतर त्यांनी एचएमटी वानाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श ठेवला आणि त्या दृष्टीने सतत आठ वर्ष बियाण्याची वाढ करतत्याचे जतन व संवर्धन केले. या त्यांच्या वानाची सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असून हे वाण एकरी 17 क्विंटल पर्यंत उत्पादन देते. याबाबतीत कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली.परंतु सतत आठ वर्षापासून एकचप्रकारचा निष्कर्ष समोर येत असल्याने कृषी अधिकारी देखील थक्क झाल्याचा दावा गरमळे यांनी केला आहे.या वानाचा स्वामित्व हक्क मिळावा यासाठी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पुण्याच्या स्वामित्व हक्क प्राधिकरण कार्यालयांमध्ये 2018 मध्य प्रस्ताव दाखल केला होता.
त्यानंतर तेथून हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठविण्यात आल्यानंतर सलग तीन वर्ष सोयाबीन संशोधन केंद्रात या वानाचा आढावा घेण्यात आला. या चाचणीमध्ये देखील हे वान सरस ठरल्याने प्राधिकरणाने गरमडे यांना त्या वानाच्या उत्पादन, विक्री, बाजार बाजार, वितरण व आयात-निर्यातीचा अधिकार दिला आहे.
या वाणाची वैशिष्ट्ये
- या वाणाच्या लागवडीच्या माध्यमातून 17 क्विंटल एकरी उत्पादन मिळते.
- येलो मोसैक रोगाला बळी पडत नाही.
- एस बी जी 997 वानाच्या झाडाची उंची 75 सेंटीमीटर पर्यंत वाढते.
- या वाणाच्या एका झाडाला 140 ते 150 शेंगा लागतात व महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये तीन ते चार दाण्याच्या शेंगा सर्वाधिक असतात.
- यामध्ये इतर सोयाबीन जातींच्या तुलनेत तेलाचे प्रमाण जास्त आहे.(स्त्रोत-लोकसत्ता)
Share your comments