1. बातम्या

केंद्राचा बफर स्टॉक मधील एक लाख टनांपेक्षा जास्त कांदा बाजारात उतरणार,या निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान

केंद्र सरकार किरकोळ बाजारात पन्नाशी ओलांडलेल्या कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बफर स्टॉक मधील एक लाख टनांपेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion

onion

केंद्र सरकार किरकोळ बाजारात पन्नाशी ओलांडलेल्या कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बफर स्टॉक मधील  एक लाख टनांपेक्षा जास्त कांदा बाजारात उतरवणार आहे

त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.सध्याचा कांदा भावाचा विचार केला तर कांदा 40 ते 45 रुपये  प्रति किलो दराने किरकोळ बाजारात विकला जात आहे.परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता केंद्र सरकार साठवणुकीत ला कांदा बाहेर काढणार आहे.याचा परिणाम हा कांद्याचे भावघसरण्यावर होऊ शकतो.यामुळे कांदा पाच ते सात रुपयांनी स्वस्त होईल. आधीच पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे हव्या त्या प्रमाणात कांद्याचे आवक नाही होत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता,परंतु आताकेंद्र सरकारच्या या निर्णयामुळेशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या वर्षी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली होती.तसेचचाळीतसाठवलेला कांदा देखील ओलाव्यामुळे सडायला सुरुवात झाली आहे. शिल्लक आहे तेवढा कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढला होता मात्र गेल्या महिनाभरात पुन्हा कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे.

 

केद्राकडे असलेला कांद्याचा स्टॉक सध्या मुंबई,दिल्ली,कोलकाता,पाटणा,रांची, गोहाटी,हैदराबाद, भुवनेश्वर,चंदिगड,चेन्नई,  कोची आणि रायपूर यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आणला गेला आहे.त्याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात मधील स्थानिक बाजारांमध्ये देखील अधिक चा कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.(संदर्भ-पुण्यनगरी)

English Summary: in central goverment onion buffer stock 1 lakh tonn onion comes in market Published on: 05 November 2021, 12:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters