नमामि गंगे मोहिमेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोर जिल्ह्यातील गंगा च्या काठावरील शेचाळीस ग्रामपंचायतीच्या परिसरात सेंद्रिय पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत.
तेथील कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी अनेक व्हाट्सअप ग्रुप बनवले असून या ग्रुपच्या माध्यमातून सेंद्रिय भाज्या, डाळी, सेंद्रिय ऊस, सेंद्रिय गूळ इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. इतकेच नाही तर भागवत प्रशासनाकडून बिजनोर जिल्ह्यात सेंद्रिय भाजीपाला, कडधान्य व तेलबिया आदींच्या प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
सगळे मिळून स्थापन केलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सेंद्रिय भाजीपाल्याचे जाहिरात आणि भाजीपाला खरेदीसाठी आवाज उठवला जात असून यासोबत विकास भवनाच्या गेटवर दुकान उघडून विक्रीदेखील केली जात आहे.या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून तेथील प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतर लोकांना जोडले आहे. सोशल मीडियावर या प्रसिद्धीचा फायदा सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
याबाबत तेथील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी सतीश कुमार, राजेश यांनी सांगितले की सुरुवातीला सेंद्रिय पद्धतीने पीक वाढवून ती विकण्यात काही अडचणी आल्या. कृषी विभाग व प्रशासनाच्या प्रेरणेमुळे सेंद्रिय पदार्थांची विक्री योग्य प्रकारे होत आहे व त्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे.
नमामि गंगे अभियानाच्या माध्यमातून गंगेच्या काठावर शेचाळीस ग्रामपंचायतीच्या परिसरात सेंद्रिय पिके घेतली जात असून गंगे लगतच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने करवंद, तुर,, हिरवी मिरची पालेज कधी हंगामी भाजीपाला तयार केला जात आहे. येथील शेतकऱ्यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार केले असून या ग्रुप वर या सगळ्या उत्पादनाचा प्रचार जोरात केला जात असून हा माल विकता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने बिजनोर शहरातील विकास भवनाच्या गेटजवळ सेंद्रिय पदार्थांचा स्टॉल सुरू करण्यात आला असून तेथून लोक मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय भाजीपाला आणि इतर वस्तू खरेदी करत आहेत.
सेंद्रिय पदार्थांचे आरोग्यदायी महत्त्व
1- सेंद्रिय पदार्थांचे उत्पादन घेताना कोणत्याही केमिकल चा वापर करण्यात येत नसल्यामुळे यांच्यात पोषकतत्वे इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक असतात. त्यामुळे अशा पदार्थांच्या सेवनाने रक्तदाबाशी निगडित समस्या, मायग्रेन, डायबीटीस आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव होतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते व शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी असते.
2- सेंद्रिय पदार्थांच्या सेवनाने वजन आटोक्यात राहण्यास मदत होऊ शकते.
3- सेंद्रिय शेतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते तसेच प्रदूषणाला आळा बसतो व मातीचे संरक्षण होऊन पाणी मुरण्याची क्षमता वाढते.
4- नैसर्गिक खतांच्या वापरामुळे पदार्थाची मूळ चव, रंग व स्वाद टिकून राहतात.
5- सेंद्रिय उत्पादने वाढवल्याने व्यापार वाढवण्यात येणाऱ्या प्राण्यांची प्रजोत्पादन क्षमता वाढते.
6- सेंद्रिय पदार्थ घेताना त्यावर अन्नसुरक्षा आणि भारताचे मानके प्राधिकरण नुसार जैविक भारत चे चिन्ह ग्राहकांनी बघून घ्यावे.
7- सेंद्रिय पदार्थ खरेदी करताना ते सर्टिफाइड असतील याची काळजी घ्या. सेंद्रिय पदार्थांचा वापर करताना पॅकेटवर देण्यात आलेली माहिती वाचून घ्यावी.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:खुशखबर! राज्य सरकार पशुसंवर्धन विभागात लवकरच होणार 2 हजार 500 पदांची भरती
Share your comments