सध्या शेतकरी परंपरागत पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतामध्ये नवनवीन प्रकारची पिके घेत आहेत आणि त्यामध्ये यशस्वी देखील होत आहेत.असाच एक प्रयोग बिहार राज्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
बिहार राज्यांमध्ये रंगीत फुलकोबीच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. या माध्यमातून उत्पादनात वाढ व्हावी हा शेतकर्यांचा हेतू आहे. या फुल कोबी मध्ये पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या रंगाची फुलकोबी चे प्रमाण जास्त आहे. बिहारच्या शेतकऱ्यांनी केलेल्या या प्रयोगामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रंगीत फुलकोबी चे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य फुलकोबीच्या बाजार भावापेक्षा या रंगीत फुलकोबी ला अधिकचा दर मिळत असल्याने शेतकर्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. बिहार राज्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला असून तो यशस्वी होताना दिसत आहे. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी विश्वविद्यालयाच्या प्राध्यापक-सहसंचालक डॉ. राजेंद्रप्रसाद व प्राध्यापक डॉ. एस के सिंग हे शेतकऱ्यांना या कोबीची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करीत आहेत.
बिहार राज्यांमध्ये बरेच शेतकरी पिवळ्या आणि इतर रंगांच्या फुलकोबीची शेती करीत आहेत. प्रयोगशील शेतकरी अनेक वर्षांपासून असे शेती करीत असल्यामुळे यामधील नवनवीन गोष्टी समोर तर येतातच पण त्या दृष्टीने बदल करणे शक्य होऊन उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे या राज्यात भविष्यात रंगीत फुल कोबीची लागवड क्षेत्रात वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको. रंगीत फुलकोबी चे बियाणे शेतकरी अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडील सारखा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी करू शकतात.
रंगीत फुलकोबीच्या आरोग्यदायी फायदे
फुलकोबी मध्ये विटामिन एजास्त प्रमाणात असल्याने रोग प्रतिकारक शक्ती मजबूत राहते व त्यासोबतच विटामिन सी देखील भरपूर प्रमाणात असते.
याकोबी मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि कॅल्शियम क्लोराईड आणि पचन प्रणाली नियंत्रित करण्यासाठी आवश्यक जीवनसत्वे समृद्ध आहेत. अशा प्रकारच्या कोबीचे लागवड ही ब्रिटन आणि फ्रान्समध्ये केली जात आहे.अशा प्रकारच्या कोबी मध्ये सर्व प्रकारची जीवनसत्त्वे असतात. डॉ. एस के सिंह यांच्या मते ही कोबी डोळ्यांसाठी फायदेशीर ठरत असून कर्करोगापासून बचावासाठी त्याचं सेवन केले जात आहे.
Share your comments