राज्यात आता अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देताना दिसत आहेत, पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांची लागवड करण्याकडे शेतकरी राजा आता वळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात देखील एका शेतकऱ्याने पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत नावीन्यपूर्ण बदल शेतीत घडवून आणला आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या तळेगाव गावाचे रहिवासी कृष्णा फलके या तरुण शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंजाब आणि हरियाणा राज्यात काळ्या गव्हाची लागवड विशेषता नजरेस पडते मात्र असे असले तरी फुलंब्री तालुक्याच्या या शेतकऱ्याने काळ्या गव्हाची लागवड करण्याचे धाडस करून दाखविले आहे. कृष्णा फलके यांनी लागवड केलेल्या काळ्या गव्हाला बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी कृष्णा फलके यांच्या वावरात हजेरी लावताना दिसत आहेत. फुलंब्री तालुक्यातील तळेगाव हे नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी ओळखले जाते, या गावातील शेतकरी नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या गावातील समाधान फलके या युवा शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड करून दाखवली होती आणि आता कृष्णा फलके यांनी देखील काळ्या गव्हाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन पायंडा घालून दिला आहे.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की काळा गहू मानवी शरीरासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्म आजारी व्यक्तींसाठी विशेष उपयोगी ठरतात. त्यामुळे काळ्या गव्हाची मागणी लक्षणीय वधारलेली आहे. तसेच या गव्हाला आपल्या साध्या गव्हापेक्षा अधिकचा बाजारभाव प्राप्त होतो. औरंगाबाद जिल्ह्यात या गव्हाची लागवड करणारे कृष्णा फलके हे पहिले शेतकरी ठरल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी मित्रांनो पंजाब कृषी विद्यापीठाने काळा गहू विकसित केला असून आज रोजी देशभरात या गव्हाची मोठी मागणी नजरेस पडत आहे. कृष्णा यांनी सर्वप्रथम लाल भेंडीची यशस्वी लागवड केली होती आणि त्यांना लाल भेंडीतुन चांगले उत्पन्न देखील प्राप्त झाले होते, लाल भेंडी पासून प्राप्त झालेल्या दर्जेदार उत्पादनानंतर कृष्णा यांनी काळ्या गव्हाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी मित्रांनो काळा गहु विकसित होण्यासाठी पाच महिन्याचा कालावधी लागतो. साधारण गहू तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जातो मात्र काळा 2 तब्बल 6 हजार 500 रुपये क्विंटल प्रमाणे विकला जातो. म्हणजे काळ्या गव्हाला साध्या गव्हापेक्षा दुपटीने भाव प्राप्त होत असतो. कृष्णा यांनी लागवड केलेल्या काळया गव्हाला तीन महिने उलटून गेले आहेत आणि येत्या दोन महिन्यात गहू काढणीसाठी तयार होणार आहे. कृष्णा यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक त्यांच्या वावरात हजेरी लावत आहेत.
Share your comments