राज्यात जवळपास सर्वत्र कांदा पिकाची लागवड केली जाते. त्याची लागवड विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात खरीप मध्ये लाल कांद्याची लागवड केली जाते, तसेच रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नाशिक जिल्ह्याला कांद्याचे आगार म्हणून संबोधले जाते. आता पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा लागवड नजरेस पडत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकरी राज्यांची लगबग बघायला मिळत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी कधी नव्हे ते विक्रमी 1 लाख 51 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड केली गेली असल्याचे समजत आहे. या आधी रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची अहमदनगर जिल्ह्यात एवढी मोठी विक्रमी लागवड कधीच नजरेस पडलेली नव्हती. मात्र यावर्षी रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करत आहेत. असे असले तरी सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण नजरेस पडत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कांदा पीक चांगलेच प्रभावित होत आहे रब्बी हंगामात लावल्या गेलेल्या कांद्यावर अनेक रोगांची सावट नजरेस पडत आहे. तसेच, हवामान खात्याने येत्या काही दिवसात खानदेशात व विदर्भात गारपीटीची शक्यतादेखील वर्तवली आहे.
यामुळे देखील नगर जिल्ह्यात थोड्या प्रमाणात का होईना वातावरणात प्रतिकूल बदल घडून येणार आहे. आणि अजून कांदा पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा पिकाला अधिकचे प्राधान्य देताना दिसत आहेत आणि म्हणूनच नगर जिल्ह्यात सर्वत्र विक्रमी कांदा लागवड बघायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात यापूर्वी एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती जो की अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा लागवड केला गेल्याचा विक्रम होता. मात्र हा विक्रम आता नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोडीत काढला असून एक नवीन विक्रम नगर जिल्ह्यात प्रस्थापित केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात फक्त कांद्याची लागवड वधारली आहे असे नाही तर रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाणारे गव्हाच्या पिकाची देखील अहमदनगर जिल्ह्यात लक्षणीय लागवड वधारली आहे. जिल्ह्यातील कांदा पिकाखालील क्षेत्र लक्षात घेता आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व भवितव्य हे भविष्यात प्राप्त होणाऱ्या दरावरच अवलंबून असेल एवढे नक्की. रब्बी हंगामातील कांदा अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करतो की मारतो हे नक्कीच बघण्यासारखे असेल.
Share your comments