1. बातम्या

या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आणि कोलमडले बाजार समितीचे नियोजन, शेतकरी व व्यापारी त्रस्त

सध्या प्रत्येक बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलापूर असो की लासलगाव त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion market

onion market

सध्या प्रत्येक बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलापूर असोकीलासलगाव त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत आहे.

 अशीच परिस्थिती अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेप्ती उपबाजार येथील कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. याठिकाणी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे लिलावाच्या दिवशीच बाजार समितीचे सगळे नियोजन कोलमडत असून त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अहमदनगर कांदा व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनासोबत जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

यासंबंधी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात गेल्या तीन-चार महिन्यांपासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून अहमदनगरच्या  शेजारी असलेल्या जिल्ह्यातून देखील आवक होत असल्याने कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे.नेप्ती उपबाजार समिती मध्ये कांदा विभागात कांदा विक्रीसाठी फक्त एकच सेल हॉल  उपलब्ध आहे. या हॉलच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त प्रमाणात कांदा येत असल्याने बाकीचा कांदा हा पार्किंग व रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उतरवा लागत आहे. त्यामुळे कांद्याचा लिलाव झाल्यानंतर गाड्या वळवण्यास व लोडिंग करण्यास खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. 

तसेच परराज्यातील ट्रक यांच्या मागेपुढे करण्यावरून बरेच वाद निर्माण होतात कांदा लोडिंग करताना त्रास होऊन ट्रक लोडिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो व कांदा वेळेवर पोहोचण्यास उशीर होतो परिणामी व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.लिलावाच्या वेळी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचे वाहन आणि लिलाव झाल्यानंतर बाहेर पडणारे वाहनांमुळे दिवसभर ट्रॅफिकची  समस्या होऊन ट्राफिक कोंडी होते व तासनतास शेतकरी व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांना या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते.

English Summary: in ahemednagar market comitee onion incoming is growth so many problem arise there Published on: 05 February 2022, 10:51 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters