शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देशाच्या दृष्टीने ज्वलंत प्रश्न आहे.या आत्महत्या मागील महत्त्वाचेकारणाचा विचार केला तर प्रशासनाचा नाकर्तेपणा हे आहे
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत मंगळवारी माहिती देताना सांगितले की गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये संपूर्ण देशात पाच हजार 579 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. 2019 च्या तुलनेत यामध्ये घट झाली असली तरीसुद्धा हा आकडा फार मोठा आहे.
एन सी आर बी अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीचा हवाला देत नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या यामागचे वेगळे कारण एनसीआरबी दिले नाही
परंतु कौटुंबिक समस्या, आजारपण, व्यसन, विवाह संबंधित विविध मुद्दे,संपत्तीचा वाद, व्यावसायिक समस्या अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे यांचे एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये मराठवाड्याचा विचार केला तर मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ आणि ओला दुष्काळ असा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
त्यामुळे मराठवाडा विभागांमध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाले आहेत. 2020 या वर्षात महाराष्ट्रात एकूण 2567 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा आकडा जर पाहिला तर देशातील एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्या च्या तुलनेत तब्बल 43 टक्के इतका आहे.म्हणजेच देशातील आत्महत्या करणारे जवळपास निम्मे शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र खालोखाल कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो.( संदर्भ-News 18 लोकमत)
Share your comments