गुळ हा प्रत्येक घरामध्ये आवडता असा पदार्थ आहे. गुळाचा वापर करून अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ देखील बनवले जातात. परंतु आपण जो गूळ खरेदी करतो त्याची गुणवत्ता किती आहे हे आपण बहुधा पाहत नाही. त्यामुळे त्यांची गुणवत्ता व शुद्धता पाहणे देखील तेवढेच गरजेचे असते.
या पार्श्वभूमीवर गुळाची गुणवत्ता टेस्ट घेण्यासाठी भारतीय अन्नसुरक्षा मानक प्राधिकरणाने संपूर्ण भारतामध्ये जेवढे राज्य आहेत, या राज्यांमधील जवळजवळ 249 जिल्ह्यांमधून गुळाचे 3060 नमुने गोळा केले होते.
या माध्यमातून एक धक्कादायक वास्तव समोर आले असून अनेक राज्यांमध्ये विकला जाणारा गुळ तितकासा खाण्यायोग्य नसुन अनेक राज्यांमध्ये विकला जाणाऱ्या गुळात रसायने मिसळल्याचे समोर आले आहे.
अनेक शहरांमधील नमुने यशस्वी ठरले असून एकूणच देशातील बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या गुळ मानकांची पूर्तता करण्यामध्ये अयशस्वी ठरले आहेत.
त्यामध्ये विशेष असे की पॅकिंग गुळा पेक्षा सुटा विकला जाणारा गुळ जास्त खराब आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने नागरिकांना पॅकिंग केलेला गूळ खाण्याचा सल्ला दिला आहे.
या शहरातला गूळ शंभर टक्के शुद्ध
पुणे, जयपुर, भोपाल, रांची, दिल्ली, इंदूर व सिलिगुडी तसेच वाराणसीत शंभर टक्के गुळ शुद्ध दिसून येतो.परंतु गुजरात राज्यातील राजकोट, उत्तर प्रदेश मधील मेरट आणि पंजाब राज्यातील लुधियाना येथील नमुन्यांमध्ये शुद्धता दहा टक्के सुद्धा आढळून आली नाही.
देशातील या दहा राज्यांमध्ये गुळ सर्वाधिक चांगला
उत्तराखंड, त्रिपुरा, मेघालय, अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, तेलंगणा, सिक्किम, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये गुळ सर्वात चांगला आहे.
नक्की वाचा:Agri Bussiness Tips: युवकांनो! शेतीआधारित करा 'हे' उद्योग,मिळेल नफा अन होईल आर्थिक प्रगती
Share your comments