सध्या लिंबांना (Lemon Demand) आता मोठी मागणी आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच त्यांचे दरही सुधारले आहेत. बाजारात शेतकऱ्यांकडून प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये या दरात लिंबांची खरेदी केली जात आहे. किरकोळ बाजारात त्याचे दर ८० रुपये प्रतिकिलोवर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत.
आवकाळी पावसामुळे लिंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी पावसाने लिंबू फळगळ झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. लिंबाला वर्षातून दोन ते तीन वेळा बहर येतो. मात्र, त्यातील सर्वच बहार हाती लागत नाही. पावसाळ्यात येणारा बहारातून फारसे उत्पन्न मिळत नाही.
उन्हाळ्यात मात्र लिंबास जास्त मागणी असते. रसवंतिगृहे, ज्यूस सेंटर आदी ठिकाणी लिंबू जास्त वापरला जातो. लिंबांची किंमत वाढल्याने त्याच्याशी संबंधित शीतपेयांच्या किमतीही आपोआपच वाढल्या आहेत. सध्या या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, मार्च एंड’मुळे बँका, सोसायट्या शेतकऱ्यांच्या मागे..
येत्या काही दिवसात लिंबू दरात आणखी सुधारणा होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मे महिना संपेपर्यंत तरी हेच चित्र बाजारात राहण्याची शक्यता आहे.जामनेर, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव भागात लिंबू पीक अधिक आहे. धुळ्यात शिरपूर, धुळे व साक्री भागात लिंबू बागा आहेत. सुमारे एक हजार हेक्टरवर लिंबू पीक खानदेशात आहे.
शेतकऱ्यांनो जैविक कीड नियंत्रण
येणाऱ्या काळात जत्रा आहेत, यामुळे मागणीत वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ! रुग्णसंख्या 16 हजारांपेक्षा जास्त, विमानतळावर चाचणी होणार..
इथेनॉल निर्मितीतून इंधन निर्मिती..
कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची, वाचा संपूर्ण माहिती..
Share your comments