1. बातम्या

Agriculture News: बटाटा लागवडीसाठी सुधारित जाती

तांदूळ, गहू आणि उसानंतर बटाटा हे भारतात सर्वाधिक लागवड केले जाणारे पीक आहे. बटाट्यामध्ये 80 ते 82 टक्के पाणी आणि 14 टक्के स्टार्च असते. ही भाजी खु्प दिवस साठवता येते. बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात त्यामुळे बटाट्याला वर्षभर बाजारात मागणी असते. शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाणांची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
potato cultivation

potato cultivation

तांदूळ, गहू आणि उसानंतर बटाटा हे भारतात सर्वाधिक लागवड केले जाणारे पीक आहे. बटाट्यामध्ये 80 ते 82 टक्के पाणी आणि 14 टक्के स्टार्च असते. ही भाजी खु्प दिवस साठवता येते. बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात त्यामुळे बटाट्याला वर्षभर बाजारात मागणी असते. शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाणांची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात.

सुधारित वाण -
कुफरी पुखराज  - ही सर्वात कमी कालावधीत तयार होणारी बटाट्याची सर्वात खास जात आहे. या जातीची चांगली गोष्ट म्हणजे ही वाण पेरणीनंतर 100 दिवसांत तयार होते.

कुफरी चंद्रमुखी - ही जात ९० ते १०० दिवसात तयार होते. या जातीचे बटाटे लांबट गोल व फिकट पांढरे असतात. साठवणुकीस ही जात उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन २५० क्विंटल पर्यंत मिळते.

कुफरी चिप्सोना  - बटाट्याची ही जात चिप्स बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. ही जात चिप्स बनवण्यासाठी योग्य मानली जाते. बटाट्याच्या या जातीमध्ये शेतकऱ्याला हेक्टरी 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळते.

कुफरी अलंकार  - ही बटाट्याची सुधारित जात असून ते प्रति हेक्टरी २०० ते २५० क्विंटल उत्पादन देते. या जातीचे बटाट्याचे पीक अवघ्या ७० दिवसांत तयार होते.

कुफरी सिंदुरी - ही जात १२० ते १३५ दिवसात तयार होते. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकारचे असतात. ही जात साठवणुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ३०० क्विंटल पर्यंत मिळते.

कुफरी नीलकंठ  - ही अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या बटाट्याची उत्कृष्ट वाण आहे, जी थंड हवामानातही तग धरू शकते. त्याची उत्पादन क्षमता इतर जातींपेक्षा जास्त आहे. या जातीचे पीक ९० ते १०० दिवसांत तयार होते. याशिवाय हा बटाटा चवीलाही चांगला लागतो.

कुफरी लवकर - ही ६५ ते ८० दिवसात तयार होणारी जात असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरे शुभ्र आकर्षक व मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणुकीत चांगला टिकतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २५० क्विंटल असते.

या शिवाय कुफरी बादशाह, कुफरी कुबेर, कुफरी ज्योती, अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत.

English Summary: Improved varieties for potato cultivation Published on: 16 November 2023, 05:53 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters