नाशिक
कांद्याचे भाव (Onion Rate) वाढल्यामुळे दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने स्टॉकमधील कांदा बाजारात आणला आहे. सरकारकडून कांद्याचे दर पाडण्याचा हा डाव आहे, असा विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. त्यावर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारती पवार म्हणाल्या की, नेपाळमधून आयात केलेला आणि नाफेडच्या स्टॉकमधील कांदा महाराष्ट्रामध्ये कांदा विक्री केला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पडणार नाहीत. तसंच नाफेडचा कांदा बाजारात विक्री केला जाणार नाही. त्याचबरोबर नेपाळमधून आयात केलेला कांदा महाराष्ट्रात येणार नाही अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या कांद्याच्या दराचा आलेख वाढू लागला आहे. त्यामुळे केंद्राने नेपाळमधून कांदा आयात करण्याची परवानगी दिली आहे. हाच मुद्दा उचलून विरोधकांनी कांद्याचे दर पडणार अशी चर्चा सुरु केली होती. त्यावर केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
Share your comments