शेतकऱ्यांनी शेतसारा अदा केला नसल्याने सक्तीची वसुली कारवाई होणार आहे. जे की कृषिपंप थकबाकीची ज्या प्रकारे अवस्था झाली होती त्याचप्रमाणे शेतसाऱ्याची सुद्धा अवस्था झालेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या थकबाकीमुळे महावितरण विभागाकडून विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना शेतसारा अदा करावा लागणार आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधी रक्कम अदा करावी लागणार आहे नाहीतर शेतकऱ्यांच्या सातबारा वर थेट महाराष्ट्र शासन नाव लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी वेळेवर रक्कम अदा करावी असे निफाडच्या तहसीलदारांनी सांगितले आहे. महसूल विभागाचे कर्मचारी सध्या गावोगावी फिरत आहेत.
नियम काय सांगतो?
शेतसारा वेळेवर अदा व्हावा म्हणून वसुली मोहीम राबिवली आहे जे की शेतकऱ्यांनी जर वेळेत रक्कम अदा केली नाही तर नोटिस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही रक्कम अदा केली नाही तर सक्तीची वसुली करण्यात येणार आहे. या सक्तीच्या कारवाईला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या नुसार कलम 176 ते 182 कायदा असा आधार आहे. पहिली नोटीस बजावल्यानंतर दुसरी नोटीस ही जंगम मालमत्ता आणि नंतर स्थावर मालमत्ता जप्त करून खातेदाराने कर अदा केला नाही तर स्थावर मालमत्ता जप्त करून खातेदाराच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासन नाव लावले जाणार आहे.
निफाड तालुक्यात कारवाईला सुरवात :-
निफाड तालुक्यात शेतसारा अदा करावा यासाठी वसुलीला सुरुवात सुद्धा केलेली आहे तर काही शेतकऱ्यांना नोटीस सुद्धा बजवण्यात आलेल्या आहेत. अर्थीक वर्ष संपायच्या आधी म्हणजेच मार्च महिना अखेपर्यंत शेतसारा अदा करावा अशी सूचना देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता वेळेवर कर भरणे गरजेचे राहणार आहे नाहीतर सक्तीची वसुली करणे सुरू केले जाणार आहे. महसूल विभागातील सध्या कर्मचारी गावोगावी फिरत आहेत.
थकबाकीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष :-
ज्या खातेदारांकडे बिगरशेती शेतसारा तसेच बिनशेती शेतसारा, दंड, मोबाईल टॉवर, लॉन्स, पंप याची रक्कम थकलेली आहे जे की या थकबाकी दारांकडे सारख्या नोटीस पाठवल्या आहेत तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. महसूल विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आता शेतकरी शेतसारा अदा करणार की त्यांच्यावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share your comments