केंद्र सरकारने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. ही केंद्र सरकार द्वारे चालविण्यात येणारे योजना शेतकऱ्यांमध्ये मोठी लोकप्रिय योजना आहे. या योजनेचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.
या योजनेसाठी सर्व आर्थिक साहाय्य केंद्र शासनाकडून केले जाते. यामुळे देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते यामुळे त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होत आहे. मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात शिवाय आता सरकार त्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे.
Importanat News
Wheat Variety : शास्त्रज्ञांनी विकसित केली गव्हाची नवीन जात; गहू उत्पादकांना होणार मोठा फायदा
बातमी कामाची! यंदाच्या खरीप हंगामात पिक विम्याबाबत वेगळा विचार सुरू; कृषिमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांचे क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे. सध्या संपूर्ण देशात क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी मोहीम सुरू आहे.
या अभियानाचे नाव आहे किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी. या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. या शिबिरांच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड बनवून दिले जाणार आहे. हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान 25 एप्रिलपासून सुरू झाले असून 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे क्रेडिट कार्ड बनवता येणार आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकरी सहकारी बँकेच्या माध्यमातून या विशेष कार्डद्वारे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकतात. या कार्ड द्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या कर्जावरील व्याजदर हा अतिशय कमी आहे.
ही कर्जे दीर्घ मुदतीची असतात जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची परतफेड सहज करता येईल. मित्रांनो आम्ही इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, किसान क्रेडिट कार्डवर मिळतं असलेल्या कर्जावर व्याजदर खुपच कमी आहे कारण की या कर्जावर असलेल्या व्याजावर सरकारकडून सबसिडी दिली जाते, ज्यामुळे व्याजदर कमी होतो.
खरं पाहता, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर 9 टक्के दराने व्याज आकारले जाते. परंतु जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला व्याजात 3 टक्के सवलत या योजनेद्वारे दिले जाते. याशिवाय केंद्र सरकारकडून 2 टक्के अनुदान दिले जाते. जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला 3 टक्के प्रोत्साहन दिले जाते. अशा प्रकारे, KCC सह, तुम्हाला 4 टक्के व्याजाने कर्ज मिळते. यामुळे KCC अर्थात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिले जाणारे हे कर्ज देशातील सर्वात स्वस्त कर्ज असल्याचा दावा सरकारकडून केला जातो.
मित्रांनो आम्ही नमूद करू इच्छितो की, किसान क्रेडिट कार्ड (KCC) मिळवणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, इंडियन बँकर्स असोसिएशनने नवीन KCC जारी करण्यासाठी प्रक्रिया शुल्क, तपासणी, खातेवही फोलिओ, KCC तयार करण्यासाठी नूतनीकरण शुल्क आणि इतर सर्व सेवा शुल्क रद्द केले आहेत. म्हणजेच आता केसीसी बनवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यामुळे निश्चितच किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments