रायगड : रायगड येथील इर्शाळवाडी बुधवारी रात्री दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अद्याप काही नागरिक बेपत्ता आहेत. शनिवारी सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एनडीआरएफने शोधकार्य थांबवले आहे.
सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या नगरिकांमुळे देखील बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी निर्णय घेतला आहे. रायगडमध्ये नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत.
घटनास्थळी जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास बचावकार्य थांबण्यात आले आहे. आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या गावात वीज नाही. दरम्यान, या ठिकाणी येणाऱ्या नगरिकामुळे देखील बचाव कार्यात अडथळे येत असल्याने एनडीआरएफच्या जवांनानी खंत व्यक्त केली.
मोठी बातमी : 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......!
दरम्यान, रायगड प्रशासनाने या पार्श्वभूमीवर दरड कोसळलेल्या घटनास्थळांच्या ठिकाणी व त्याच्या परिसरात इरसालगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणुक केलेल्या इतर व्यक्ती/ सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
वरील व्यक्तिंव्यतिरिक्त जर कुणी या परिसरात आले तर भारतीय दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) नुसार दिनांक २३ जुलै ते दिनांक ६ ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार आहेत. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या सोबतच या घटनेत अनाथ झालेल्या २२ मुलांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदे फाऊंडेशन पुढे आले आहे. या घटनेत अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वीकारले आहे.
Share your comments