मुंबई
राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलेच तापत आहे. यातच आज (दि.२) रोजी मुंबईत महत्त्वाच्या तीन राजकीय बैठका होणार आहेत. त्यामुळे तिन्ही बैठकांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महाविकास आघाडी, महायुती आणि भाजपची स्वतंत्र बैठक आज पार पडत आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीला आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता बोलली जात आहे.
७ वाजता महायुतीची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुतीची ताज हॉटेलमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तसंच भाजप आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर निवडणुकांबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
दरम्यान, महायुतीची बैठक झाल्यावर भाजपची एक स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष झालेल्या निवडतील सर्व सदस्यांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीतून जिल्हाध्यक्षांना कामाचं स्वरुप समजावून सांगण्यात येणार आहे.
Share your comments