शेतकऱ्यांना 2020 मध्ये झालेल्या नुकसानीमुळे पीक कर्ज परत देता आले नाही आणि आता यावर्षी देखील 2021 मध्ये कर्ज घेतले. शासनाकडून जी अनुदान निधी शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी त्यांच्या बँक खात्यावर जमा होतात परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्यामुळे शेतकऱ्याला त्या पैशांची गरज असते
बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये अनुदान चे पैसे येतात व ते पीक कर्ज मध्ये वळवलेजातात. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही याच विषयाशी संबंधित तक्रारी शासनाकडे देण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात 15 डिसेंबर 2021 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन बँकांना काही निर्देश देण्यात आले आहेत.या लेखात यासंबंधीचे शासन परिपत्रक पाहू.
यासंबंधीचे शासन परिपत्रक
- मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने निधीचे वाटप करताना विविध दक्षता घेण्याचे महसूल व वन विभागाच्या क्रमांक दोन अन्वये हे निर्देश दिले आहेत.
- वरील निर्देशांचे अनुषंगाने या परिपत्रकां अन्वये सुचित करण्यात येते की, गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिके व वार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करतांना मदतीच्या रकमे मधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये.
- याबाबतची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दखल घ्यावी.
- सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक 202112151514104702 असा आहे. शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
Share your comments