गेल्या सात महिन्यापासून ऊसाचा गाळप हंगाम (Sugarcane crushing season) सुरु आहे. तरी पण आणखी अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळ आणि साखर आयुक्ताची (Sugar Commissioner) एक बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे साखर आयुक्तांनी मान्य केले आहे. अतिरिक्त ऊसाचे गाळप तात्काळ करण्याबाबत साखर आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. साखर आयुक्तांनी बीड, परभणी, जालना व उस्मानाबाद येथील अतिरिक्त ऊस बाहेरील कारखान्यात गाळपाला जावा.
महत्वाच्या बातम्या :
धक्कदायक: दरवर्षी लाखों लोकांचा 'या' आजाराने होतो मृत्यू, तुमच्यात तर नाहीत ना ही लक्षणे, सावध व्हा
Gudi Padwa 2022: गुढी पाडव्याला आहे खास महत्त्व; जाणून घ्या या दिवसाचं वैशिष्ट
दैनंदिन आकडेवारी शासनाच्या लक्षात यावी यासाठी बीड जिल्ह्यासाठी दोन आणि परभणी जिल्ह्यासाठी दोन विशेष नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करत याकडे लक्ष ठेवण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राज्य किसान सभेचे शिष्टमंडळ आज साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांना भेटले. या बैठकीत राज्य किसान सभेचे उमेश देशमुख, अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, दत्ता डाके जगदीश फरताडे, दिपक लिपने, सुधाकर शिंदे यांच्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
Share your comments