नमस्कार मित्रांनो मी एक शेतकरी मागील सत्रात अठरा वर्षांपासून शेती व्यवसायात कार्यरत शेतीची सुरुवात केली तेव्हा मनात खूप स्वप्न आणि त्या स्वप्नाच्या पूर्ण करण्यासाठी खूप जिद्द खूप चिकाटी मनाशी बाळगून सुरुवात केली
पण समोर चालता चालता चालता खूप प्रयत्नही करून यश कधी त्या शेतीतून मिळत नवहते हे दिसत असतानि सुधा तरी पण शेती सुरूच होती की कधीना कधी यश मिळेल पण मित्रांनो यश काही मिळाला नाही शेतीत भाजीपाला कडधान्य मोसंबी संत्रा आणखी ईतर पिके करूनसुद्धा यश मिळत नव्हते याचं कारण नेमके जेव्हा शोधलं की काय कारण की यश मिळत नाही शेतीमध्ये तर माझ्या मते मला असे वाटले की शेतीमध्ये यश न मिळण्याचा काही कारण आहे.
नक्की वाचा:अशा प्रकारे करा हळदीच्या बेण्याची साठवणूक, उत्पादन वाढीस होईल मदत
सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण
सरकार कुठलाही येऊ द्या पण शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे असं कोणालाही वाटत नाही सरकारमध्ये येण्यापूर्वी खूप शेतकऱ्यांना आश्वासन पण आल्यानंतर त्याची पूर्तता खूप अल्प प्रमाणात तुम्हाला एक उदाहरण देतो.हल्लीच्या काळात शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळते पण ती पूर्ण आठ तासही शेतकऱ्यांना मिळत नाही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे वेळापत्रक लाईनचे राज्यकर्त्यांनी या विजेवर खूप राजकारण केलं पण कुठल्याही राजकारण्यांनी शेतकऱ्यांना बारा तास लाईट देऊ शकले नाही आणि आठ तास देऊनही दिवसांनी लाइट देऊ शकले नाही.
रात्रीची लाईट साप विंचू जनावर यांचा धोका अश्या त्रासातून शेतकरी समोरच जात आहे तरी सुद्धा त्या राज्यकर्त्याला त्याची चिंता नाही फक्त त्या विषयावर त्यांनी राजकारण केलं आणि आपली सत्ता काबीज केली आणि सत्ता आल्यावर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल हेच चित्र आजपर्यंत दिसत आहे अशासारखे अनेक उदाहरण शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे म्हणून सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहेआज शेती विषय हा खूप किचकट बनत चाललेला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही शेतकर्यांना वीज नाही शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्यांच्या शेतात मजूर काम करायला तयार नाही ही तयारी झाला तर त्याचे रोजी देण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये राहिलेले नाही कोणतं पीक शेतात लावा व कि जयाचे दोन पैसे होतील याचा विश्वास राहिलेला नाही.
नक्की वाचा:पंजाबरावांचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सूचनावजा इशारा, सावध राहण्याचे आवाहन
भारत कृषी प्रधान देश आहे समता अतिशय दुःख होते की ज्या कृषिप्रधान देशांमध्ये शेती करणारा शेतकरी आज आत्महत्या करत आहे याला कारण सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण शेती करणारा शेतकरी सुखी समृद्ध तर झालाच नाही पण त्यांच्यावर व्यवसाय करणारे व्यापारी कारखानदार दलाल आणि असे अनेक श्रीमंत आणि बलाढय़ झाले.
पण तोच पिकवणारा शेतकरी राजा आत्महत्येला बळी पडला ही या देशाची शोकांतिका आहे याला कारण सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण मित्रांनो विषय फार मोठा आहे प्रश्न एकच पडत आहे आता की जर शेती करणार्या शेतकर्यांच्या पाठीशी कोणीच नाही तर त्याने शेती करावी का?
धन्यवाद.
लेखक- विपुल चौधरी
मो.नं.9588462272
Share your comments