1. बातम्या

Agriculture Update:शेतीच्या महत्वाच्या बातम्या,जाणून घ्या क्लिकवर

देशातील गारठा आता काही अंशी कमी होताना दिसत आहे. याचबरोबर राज्यातील तापमानात देखील वाढ होऊ लागल्याने गरमीचे वातावरण निर्माम झाले आहे. मात्र राज्यातील काही भागात गारठा अद्यापही कमी आहे. येत्या ४८ तासात राज्यातील वातावरणात बदल होऊन गारठा कमी होण्याची शक्यता आहे. याबरोबरच तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शेतीच्या महत्वाच्या बातम्या,जाणून घ्या क्लिकवर

शेतीच्या महत्वाच्या बातम्या,जाणून घ्या क्लिकवर

१.राज्यातील तापमानात वाढ,गारठा होणार कमी
२.काजूला २०० रूपये हमीभाव द्या,काजू उत्‍पादकांची मागणी
३.तुरीचे बाजार भाव ११००० चा टप्पा पार करण्याची शक्यता
४.कांद्याच्या दरात घसरण सुरूच,उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप
५.शेतकऱ्यांनी संघटीत होवून मोठा लढा देणे गरजेचे-रविकांत तुपकर


१.राज्यातील तापमानात वाढ,गारठा होणार कमी

देशातील गारठा आता काही अंशी कमी होताना दिसत आहे. याचबरोबर राज्यातील तापमानात देखील वाढ होऊ लागल्याने गरमीचे वातावरण निर्माम झाले आहे. मात्र राज्यातील काही भागात गारठा अद्यापही कमी आहे. येत्या ४८ तासात राज्यातील वातावरणात बदल होऊन गारठा कमी होण्याची शक्यता आहे. याबरोबरच तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची हवामान खात्याने व्यक्त केली आहे.देशभरातील हवामानाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. भारतातील काही राज्यांमध्ये दिवसा चांगला सूर्यप्रकाश आहे. तर काही राज्यांमध्ये दिवसा थंडीचा कहर सुरूच असतो. आता दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या राज्यांमध्ये थंडी हळूहळू कमी होताना दिसत आहे. अशा स्थितीत मैदानी भागातील अनेक भागात किमान तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.राजस्थान आणि बिहारच्या अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा ३-६ अंश सेल्सिअस कमी राहू शकते. IMD ने पुढील ७ दिवसांत मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात हलक्या पावसासह हिमवृष्टीचा इशारा दिला आहे.

२.काजूला २०० रूपये हमीभाव द्या,काजू उत्‍पादकांची मागणी

कोकणातील काजू उत्‍पादक शेतकऱ्यांना आयात काजूवरील शुल्‍क कमी केल्‍याचा फटका बसला आहे. चार वर्षांत २०० रूपये प्रतिकिलो काजूचा दर आता ८० रूपयापर्यंत आला आहे. यात काजू उत्‍पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हे नुकसान भरून येण्यासाठी राज्‍य शासनाने काजूला २०० रूपये हमी भाव जाहीर करावा,अशी मागणी काजू उत्‍पादक शेतकऱ्यांनी केली.जर शासनाने हमीभाव न दिल्‍यास १६ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.आयात काजूमुळे बाजार भाव कोसळला आहे.कोकणातील काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सरकारने काजू बी विक्री २०० रुपये हमीभाव सरकारने जाहीर करावा.या मागणीसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर १६ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांच्यावतीने देण्यात आला.

३.तुरीचे बाजार भाव ११००० चा टप्पा पार करण्याची शक्यता

तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे पुन्हा एकदा तुरीचे बाजार भाव वाढले आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील या मुख्य पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.शेतकऱ्यांनी तुरीची आवक कमी केली.यावर्षी तुरीला विक्रमी दर मिळणार आहे. यामुळे त्यांनी तुरीची विक्री थांबवली आणि परिणामी आता पुन्हा एकदा तुरीचे बाजारभाव वाढू लागले आहेत.यवतमाळ खासगी बाजार समितीत ८९०० ते ९७०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे तुरीला भाव मिळतो आहे.येत्या काही दिवसांत तुरीचे दर आणखी वाढतील,अशी शक्यता आहे.

४.कांद्याच्या दरात घसरण सुरूच,उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप

कांदा निर्यात बंदीमुळे सगळ्यात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे.कांदा उत्पादन शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा चा भाव आता ८०० रुपयांपेक्षा कमी आला आहे. यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा सगळ्यात मोठा फटका हा कांदा उत्पादन शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. यामुळे शेतकरी संतापला असून याचा भडका आज सोमवारी २९ रोजी लासलगाव बाजार समितीत पाहायला मिळाला. येथे कांद्याला भाव मिळत नसल्याने संपालेल्या शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलावच बंद पाडला आहे.

५.शेतकऱ्यांनी संघटीत होवून मोठा लढा देणे गरजेचे-रविकांत तुपकर

रविकांत तुपकर यांची देवळी जि.वर्धा येथे शेतकरी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात एल्गार सभा पार पडलीय. युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने मा.किरणजी ठाकरे यांच्या नेतृत्वात तीन दिवसांची शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. जवळपास १०० गावांतून ही यात्रा फिरली. या यात्रेचा समारोप कालच्या ता.२८ जानेवारी २०२४ एल्गार सभेने झाला.यावेळी रविकांत तुपकर म्हणाले सध्याच्या काळात शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय वाईट असून सोयाबीन,कापूस व धान व इतर शेतीपिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. गेल्या वर्षांचा पीकविमा व दुष्काळाची मदत अद्याप मिळालेली नाही. अशा परिस्थितीत सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होवून मोठा लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी केले.

English Summary: Important agricultural news agriculture news news update Published on: 29 January 2024, 04:10 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters