1. बातम्या

कृषिमंत्र्याचा महत्वाचा सल्ला आला रे….! खरीपाच्या तोंडावर दादांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा अन अनमोल सल्ला

राज्याचे कृषिमंत्री (Agriculture Minister) आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादाजी दगडू भुसे (Dadaji Bhuse) यांनी राज्यातील तमाम शेतकर्यांना (Farmers) एक अनमोल सल्ला जारी केला आहे. मित्रांनो सध्या राज्यात उन्हाळी हंगामातील पिकांची उचलबांगडी झाली असून शेतकरी राजा सध्या खरीप हंगामाकडे (Kharif Season) वळला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
agriculture minister

agriculture minister

राज्याचे कृषिमंत्री (Agriculture Minister) आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादाजी दगडू भुसे (Dadaji Bhuse) यांनी राज्यातील तमाम शेतकर्यांना (Farmers) एक अनमोल सल्ला जारी केला आहे. मित्रांनो सध्या राज्यात उन्हाळी हंगामातील पिकांची उचलबांगडी झाली असून शेतकरी राजा सध्या खरीप हंगामाकडे (Kharif Season) वळला आहे.

राज्यातील तमाम शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची (Pre-Cultivation) कामे करीत आहेत. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आगामी हंगामासाठी पूर्वमशागत करावी लागते अगदी त्याच पद्धतीने मायबाप शासनाला (Maharashtra Government) देखील पुढील हंगामासाठी शासनस्तरावर योग्य त्या उपाययोजना कराव्या लागतात.

सध्या जिल्हा स्तरावर बी-बियाणे, खताची उपलब्धता यासाठी आवश्यक यंत्रणा याबाबत आढावा घेणे सुरू आहे. यादरम्यान महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला देखील जारी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

भावा फक्त तूच रे…! 10 गुंठ्यात ब्रॉकोली लागवड केली अन मिळवलं 2 लाखांचे उत्पन्न; वाचा काय होतं नियोजन

दीड एकरात फुलवला सूर्यफूलचा मळा आणि एकाच वर्षात बनला लखपती; वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काय दिला कानमंत्र

मित्रांनो दरवर्षी शेतकरी बांधव एखाद्या पाऊस पडला की लगेचचं खरीप हंगामात पेरणी करत असतात. मात्र अनेकदा यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असतो. एखादा पाऊस झाला की पाऊस लांबणीवर जातो आणि मग पुन्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते.

यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शिवाय पेरणीसाठी घेतलेली मेहनत देखील वाया जाते. यामुळे शेतकरी बांधवांनी 100 मिमी पाऊस जोवर कोसळत नाही तोपर्यंत खरीप हंगामात पेरणी करू नये असा सल्ला कृषिमंत्र्यांनी दिला आहे. एवढेच नाही कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना पेरणी करण्यापूर्वी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा एकदा सल्ला घ्यावा असे आव्हान देखील या प्रसंगी केले आहे.

भुसे यांच्या मते कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पिकाचे नियोजन केल्यास निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. याशिवाय भुसे यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी खत बी बियाणे यांची चिंता न करता केवळ उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे. राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी पीक कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही देखील यावेळी कृषीमंत्री यांनी दिली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कृषिमंत्र्यांनी खतांबाबत दिली ही माहिती

सध्या राज्यात तसेच देशात खरीप हंगामासाठी खतांची टंचाई होईल अशी बतावणी जोर धरू लागली आहे. मात्र ही गोष्ट वास्तविकताला धरून नसून ही केवळ अफवा असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ही अफवा पसरवून मध्यस्थी खतांची दरवाढ करणार असल्याची शंका देखील यावेळी भुसे यांनी व्यक्त केली.

मात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण असून  राज्याने मागणी केलेल्या खता पैकी बहुतांशी खतांचा साठा केंद्राने मंजूर केले असल्याचे देखील यावेळी भुसे यांनी स्पष्ट केले. भुसे यांच्या मते राज्याने 52 लाख मेट्रिक टन खतांची मागणी केली होती त्यापैकी 45 लाख मेट्रिक टन खताला केंद्राने मंजुरी दिली आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी खतांची तसेच बी-बियाणांची चिंता करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. याशिवाय भुसे यांनी खरीप हंगामात वाढीव दराने खताची विक्री केल्यास संबंधित दुकानदारांवर तसेच खत निर्माती कंपनी वर कारवाई केली जाईल असे देखील स्पष्ट केले. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

English Summary: Important advice from the Minister of Agriculture. Dada's great consolation and invaluable advice to the farmers in the face of kharif Published on: 09 May 2022, 09:15 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters