1. बातम्या

तूर आणि उडीद आयातीचा परिणाम होऊ शकतो या पिकांच्या दरावर

भारत सरकारने 24 जून 2021 रोजी म्यानमार व मलावी या देशांत सोबतपंचवार्षिक सामंजस्य करार केला आहे.या

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
red gram daal

red gram daal

 भारत सरकारने 24 जून 2021 रोजी म्यानमार व मलावी या देशांत सोबतपंचवार्षिक सामंजस्य करार केला आहे.या

 करारानुसार वर्ष 2021-22 हे वर्ष 2025-26 ही पाच वर्ष व्यापाराच्या माध्यमातूनआयात होणार आहे.या करारानुसार दरवर्षी मलावी देशांकडून 50000 टन तूर,  म्यानमार कडून एक लाखतूरतसेच अडीच लाख टन उडीद ईतकाशेतमाल आयात होणार आहे.

 त्यामुळे या निर्णयाचा परिणाम हा स्थानिक  शेतकऱ्यावरहोणार आहे. याबाबतची अधिसूचना विदेशी व्यापार महासंचालनालयाच्या  वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलीआहे.

 एकीकडे कडधान्य पिकांच्या लागवडीसाठी केंद्रसरकार प्रोत्साहन देण्याच्या घोषणा करीत असताना दुसऱ्या बाजूने डाळि आणि तेलबियांची आयात जोरदार सुरू झाल्याने दर खाली येऊ शकतात. तूर आणि उडीद या डाळींची आयात झाल्याने तसेच शेतकऱ्यांचीतूर आणि उडीद बाजारात येईल त्यामुळे पुरवठा वाढून दर घसरण्याची दाट शक्यता आहे.

सध्या तुरीचे दर हे सहा हजार 700 रुपये प्रतिक्विंटल सरासरी व उडीदाचे दर हे सहा हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल असा आहे. विशेष म्हणजे हा करार पाच वर्षाचा असल्यामुळे शेतकऱ्यांना याची झळ5 वर्ष बसणार आहे.( स्त्रोत – सकाळ)

 

English Summary: import of red gram and vigna mungo dal effect on market Published on: 11 September 2021, 12:38 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters