मागील काही दिवसांपासून देशात खाद्यतेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत होता. हीच बाब ओळखून केंद्रसरकारने खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केल्यामुळे खाद्य तेलाच्या किमती आता घसरु लागल्याचे दिसत आहे. तसेच ग्राहकांना वाढत्या महागाईत दिलासा मिळू लागला आहे.
या आयातीमुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होत असल्याचा कल सध्या दर्शवत आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरापासून गगनाला पोहोचलेल्या खाद्यतेलाचे किंमती आता खाली येत आहे. खाद्य तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय किमती, देशांतर्गत उत्पादन यासारख्या समन्वित घटकांवर अवलंबून असतात. देशांतर्गत वापर आणि उत्पादन यांच्यातील दरी जास्त असल्याने भारतात खाद्य तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडावा म्हणून केंद्र सरकार मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देत आहे.
या सगळ्या उपाययोजनांमुळे भारत खाद्य तेल निर्मितीच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. आताच्या आयात वाढल्यामुळे किमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. जर मुंबईचा विचार केला तर तिथल्या किंमतीनुसार खाद्य तेलाच्या किमती मध्ये जवळजवळ 20 टक्क्यांची घट नोंदवण्यात आले आहे..
पाम तेलाची किंमत 142 रुपये प्रति किलो होती. आता ती घसरून 115 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाल्याने जवळजवळ 19 टक्क्यांची घट पाम तेलात झाली आहे. त्याप्रमाणे सूर्यफूल तेलाची किंमत 188 रुपये प्रति किलो होती आता ती 157 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाल्याने त्यात जवळजवळ 16 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सोया तेलाची किंमत 162 रुपये प्रती किलो होती, आता ती घसरून 138 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाल्याने त्याच्या किंमती 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याप्रमाणेच मोहरीच्या तेलात देखील घसरण होऊन 175 रुपयांपासून 157 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झाले आहे. शेंगदाणा तेलाची किंमत प्रति किलो 190 रुपये होती, ती कमी होऊन 174 रुपये प्रति किलो झाली आहे. वनस्पती तेलाची किंमत प्रति किलो 154 रुपये होती, आता ती 141 रुपये प्रति किलोप्रमाणे कमी झाले आहे.
Share your comments