1. बातम्या

कच्च्या पाम तेलाच्या आयात शुल्कात घट

KJ Maharashtra
KJ Maharashtra
palm oil aayaat shulk kapaat

palm oil aayaat shulk kapaat

 मागील काही दिवसांपासून खाद्य तेलाचे भाव गगनाला पोचले आहेत. त्यामुळे  लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या भावाला अटकाव करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत आहेत. मागील काही दिवसांपासून खाद्य तेलाचे भाव गगनाला पोचले आहेत. त्यामुळे  लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या भावाला अटकाव करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत आहेत.

 केंद्र सरकारने आता कच्चा पाम  तेलावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांनी कपात केली आहे. अगोदर असलेल्या कच्च्या तेलावरील 15 टक्के आयात शुल्कात पाच टक्के कपात करत ती  आत्ता  दहा टक्‍क्‍यांपर्यंत केली आहे. ही केलेली कपात 30  जून पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत लागू असेल.आता कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क हे  35.75 टक्क्यांवरून घसरून आता 30.25 टक्क्यांवर आले आहे.

 देशात मागील काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप वाढला होता. देशात गेल्या वर्षी तेलबियांच्या उत्पादनात घट नोंदवली गेली होती. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले. त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेल बाजारातही किमतीत वाढ  पाहायला मिळाली. यामुळे सरकारवर बऱ्याच प्रकारचा दबाव वाढत होता त्यामुळे सरकारने कडधान्यतील तेजी विविध उपाय करून  काही प्रमाणात कमी केली. अशा परिस्थितीत कच्चा पाम तेला वरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची कपात करून आयातीला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या कपाती बरोबर सरकारने रिफाइंड, शुद्ध आणि गंध रहित पाम तेल आणि पामोलिन आयातीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत.

 

 आपल्या भारतात जेवढे खाद्यतेलाची आवश्यकता आहे त्यापैकी 60 टक्के खाद्यतेल हे आयात केले जाते. आयातीचे  एवढे प्रमाण असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात थोडीजरी घडामोड झाली तर लगेच खाद्य तेल दरावर परिणाम होतो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर वाढल्यामुळे देशातही तेजी पाहायला मिळाली. आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, मोहरी, तीळ, सरकी, वनस्पती तेल, इत्यादी खाद्य तेलाला जास्त पसंती दिली जाते. परंतु मागील काही वर्षांत यातील बहुतेक तेलबिया पिकांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसून उत्पादनात मोठी घट झाली होती व त्याचा परिणाम हा खाद्यतेल दरात वाढ होण्यात झाला होता.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters