यावर्षी हंगामाच्या पहिल्या मध्यम-तीव्रतेच्या गडगडाटी वादळाच्या प्रभावाखाली देशाच्या उत्तर-पश्चिम भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. निश्चितच उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेस
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, येत्या पाच दिवसांत पश्चिम राजस्थान वगळता देशात इतरत्र कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.
हवामान प्रणालीमुळे सोमवारी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग निर्माण झाले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी गडगडाट झाला, तर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात पाऊस पडला.
IMD ने सांगितले की, "26 आणि 27 मे रोजी पश्चिम राजस्थानमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे." याशिवाय, पुढील पाच दिवसांत देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. हवामान कार्यालयाने मंगळवारी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.
याशिवाय जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी जोरदार वारे (30-40 किमी प्रति तास) वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Share your comments