जगातील सर्वात मोठी खताची कंपनी सहकारी समिती इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को-आपरेटिव्ह लि. (IFFCO)ने अर्थ वर्ष २०१९ -२० दरम्यान उत्पादन, विक्री, नफा आणि ऑपरेशनच्या क्षेत्रात आतापर्यंतचा सर्वोत्तम कामगिरी करत एक विक्रम केला आहे. इफकोला १००५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा रहिला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.
मागील वर्षी कंपनीने २०१८-१९मध्ये ८४१.५८ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. कठिण परिस्थिती आणि अनिश्चित बाजार स्थिती तसेच खराब असलेले हवामानातही कंपनीने १३३ लाख टन उर्वरकांची विक्रमी विक्री केली आहे. ५७ हजार ७७८ कोटी रुपयांचा व्यवहार वर्ष २०१९-२० च्या दरम्यान इफकोच्या सामूहिक व्यवहार हा ५७,७७८ कोटी रुपये राहिला. तर वर्ष २०१८-१९ च्या दरम्यान हे रुपये ५० हजार ९०८ कोटी होता.
कंपनीच्या कामावरती नजर टाकल्यास वित्त वर्ष २०१९-२० च्या दरम्यान इफकोचा एकूण उर्वरक उत्पादन मागील वर्षाच्या ८१.४९ लाख टनांनी वाढून ९१.४२ लाख टन झाला. वर्ष २०१९-२० च्या दरम्यान झालेल्या उर्वरक उत्पादनातून युरियाचे उत्पादन ४८.७५ लाख टन होते. तर मागील वर्षी याचे उत्पादन ४५.६२ लाख टन तसेच ३५.८७ लाख टन राहिले
इफको मागील अर्थ वर्षाच्या दरम्यान १३३.३१ लाख टन उर्वरकांची विक्री केली, ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. वर्ष २०१८-१९ च्या दरम्यान ११५.५६ लाख टन उर्वरकांची विक्री झाली होती. एकूण विक्रीत युरियाची ८६.३१ लाख टन तसेच डीएपी /एनपीकेची ४७ लाख टन विक्री झाली. भारतात कलोल, कांडला, फूलपुर, आवला तसेच पारादीपमध्ये स्थित आपल्या एकूण पाच सहयोगी तसेच परदेशात असलेल्या तीन सहयोगीसह इफको जगातील सर्वात मोठी सहकारी समिती आहे.
इफकोचे व्यवस्थापक निदेशक डॉ. उद्य शंकर अवस्थी म्हणाले की, जागतिक आणि आर्थिक आव्हान या २०१९-२० वित्त वर्षात होते. तरीही इफकोने जी कामगिरी केली आहे, ती अविश्वासनीय आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इफकोने देशातील कोना-कोपऱ्यात उचलेले विविध पावलांनी न फक्त राष्ट्र निर्माण नाही तर वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत मिळेल. इफकोने उर्वरकांच्या आपल्या मुळ व्यवसायासह इतर विमा, ग्रामीण खुदरा व्यापार, कृषी वानिकी, ग्रामीण दूरसंचार, कृषी रसायन, ग्रामीण वित्त, वस्तू परिवहन व्यवस्था आणि विशेष आर्थिक क्षेत्रात एसईझेड मध्ये पण आपल्या व्यापार विस्ताराला आहे.
Share your comments