ऊस हे पिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे पीक आहे.ऊस शेतीसाठीइतर पिकांपेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागते.महाराष्ट्रामध्ये सध्या उसाच्या क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे.परंतु ऊस उत्पादन घेतांना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपण बर्याचदा ऐकतो किंवा वाचतो की शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला किंवा ट्रांसफार्मर मधील घोटाळ्यांमुळे उजळीत होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढले आहे.
अशापद्धतीने उसाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना विजेच्या एखाद्या घटनेमुळे उसाचे नुकसान झाले तरनुकसान भरपाई कशी मिळवावी हे माहीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होते.यासंबंधी महावितरणकडे लागणारेकोण कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची व नुकसान भरपाई कशी मिळवायची? या सगळ्यात बद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
या कागदपत्रांची पूर्तता करावी
- महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळाला असेल तर शेतकर्याला महावितरणाच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे ही अर्जासोबत जमा करावी लागतात.
- यामध्ये तीन वर्षाचा मागचा सातबारा, महसूल विभागाचा आणि पोलिसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे त्याचे फोटो, उसा सोबतच त्या क्षेत्रातील ठिबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य याचेही नुकसान झाले असेल तर त्याचे बिल. तसेच साखर कारखान्याची मागच्या तीन वर्षाची बिलेही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.
- किती एकर नुकसान झाले आहे त्यासंबंधीचा कृषी विभागाचा अहवाल. या अहवालामध्ये शेतकऱ्याचे किती नुकसान झाले आहे याचा उल्लेख असणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्ज सोबत जोडून दाखल करावी लागणार आहेत.
या सगळ्या घटनेत महावितरणची भूमिका काय असते?
1-शेतकऱ्याचा अर्ज दाखल झाल्यानंतर महावितरणकडून ही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जातो.
2-यासाठी महावितरणकडून एका निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली असते.जिल्हा निहाय अशा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली असतात.
- चेकलिस्ट,फॉर्मअ,फार्म क्रमांक 2,उपविभागीय अधिकाऱ्यांची टिपणी, शाखा अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा जबाब,स्केच,विद्युत निरीक्षकाचे पत्र, उपविभागीय अधिकाऱ्यांची टिपणी, कारवाई अहवालाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांची टिपणी तसेच प्रत्यक्ष पाहणी करून महावितरणचे अधिकारी हा अहवाल अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादरकरतात.
- या सगळ्या प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा होता.
परंतु ऊस जळीत घटनांमध्ये एक महत्त्वाचे असे आहे की, बांधावरील तन पेटवून दिल्याने किंवा अन्य कारणांमुळे ऊस जळीताच्या घटना घडतात. मात्र अशा घटनांमध्ये नुकसानभरपाईचा मुद्दा येत नाही.
( संदर्भ- हॅलो कृषी )
Share your comments