भारत एक कृषिप्रधान देश आहे भारताची अर्थव्यवस्था देखील शेती क्षेत्रावर आधारित आहे मात्र कृषिप्रधान भारत देशात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शेतीमध्ये शेतकरी बांधवांना कायमच तोटा मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी आलेला खर्चदेखील काढणे अशक्य आहे यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे यामुळे शेतकऱ्यांना आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी देखील आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे माय-बाप शासन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र असे असले तरी शासनाचे प्रयत्न हे केवळ पांढऱ्या कागदावरच शोभून दिसत आहेत बांधावरची परिस्थिती डोकावून बघता शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही मोठी दयनीय बघायला मिळते. यामुळे शेतकरी बांधवांना पीकपद्धतीत बदल करण्याचा वैज्ञानिक सल्ला देत असतात
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अशी अनेक पिके आहेत, ज्याची लागवड करून आपण चांगले विक्रमी उत्पन्न मिळवू शकता. यापैकीच एक पीक आहे सागवान अर्थात साग. सागवान लाकडाला बाजारात मोठी मागणी आल्याने या पिकातून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळू शकते. सागवान लाकडाला नेहमी चांगला भाव मिळत असल्याने यांची शेती शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सागवान शेती सुरू केली तर काही वर्षांत शेतकरी बांधवांना करोडोंचा नफा मिळू शकतो.
सागवान शेती ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्याची शेती भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात करता येणे शक्य आहे. असे असले तरी सागवान शेती सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. खरं पाहता यांची शेती कोणत्याही महिन्यात सुरु केली तरीदेखील काही हरकत नाही मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात यांची शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळत असते. तज्ज्ञांच्या मते, सागवान रोपे लावण्यासाठी 6.50 ते 7.50 दरम्यान मातीचा pH असावा, कारण की, अशा शेतजमिनीत सागवानाची लागवड केली तर झाडे लवकर वाढतात आणि चांगले उत्पन्न मिळते.
मित्रांनो आम्ही इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, सागवानाची शेती सुरु केली आणि लगेच करोडपती बनणं अशक्य आहे. सागवान शेतीपासून चांगला नफा मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना थोडा संयम ठेवावा लागणार आहे. सागवान लागवड केल्यानंतर पहिली तीन ते चार वर्षे याच्या झाडाची चांगली काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात त्याची काळजी घेतल्यास येणाऱ्या काळात यापासून अधिक नफा मिळवला जाऊ शकतो.
सागवान लागवड केल्यानंतर सुमारे बारा वर्षानंतर यापासून उत्पादन मिळते त्यामुळे आपण सागवान पिकात आंतरपीक घेऊन लगेचच उत्पन्न मिळवू शकता. यामुळे सागवान शेती साठी येणारा खर्च सहज रित्या काढला जाऊ शकतो शिवाय शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील. शेतकरी मित्रांनो असं सांगितलं जातं की, सागवानाची 500 झाडे लावली तर बारा वर्षानंतर करोडपती बनता येणे सहज शक्य आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बाजारात सागाच्या एका झाडाला 35 ते 40 हजार रुपये दर मिळतो. या पद्धतीने जर आपण विचार केला तर 12 वर्षात पाचशे सागाची झाडे लावून करोडपती बनले जाऊ शकते.
Share your comments