1. बातम्या

तुम्हाला जास्ती जास्तीत पैसा हवा असेल तर करा 'या' तीन झाडांची लागवड

sandwood plantation

sandwood plantation

सध्या सेंद्रिय शेतीचं महत्त्व वाढत असून शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होत आहे. या शेतीसह अजून एक शेती आहे, ती म्हणजे जंगल शेती यातूनही तुम्ही दमदार कमाई करुन वेगळ्या प्रकारची शेती करुन शकतात. या शेतीतून तुम्हाला अधिक पैसा कमावयाचा असेल तर तुम्ही पिकांचे उत्पन्न न घेता झाडांची लागवड करुनही पैसा कमावू शकतात.

 जर आपण जंगल शेती करण्यास तयार नसाल तर आपल्या शेतातही या वृक्षांची लागवड करुन लक्ष्मी कमावू शकतात. शेतकऱ्यांना योग्य मदत आणि आयडियाज मिळाल्या तर त्यांना चांगला नफा देखील मिळू शकेल. फक्त त्यांना योग्य मार्गाने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. भारतातील बहुतेक शेतकरी भाजीपाला, फळे आणि धान्य इत्यादींची लागवड करतात.

परंतु आज आम्ही आपल्याला याठिकाणी पिके नव्हे तर झाडांच्या लागवडीबद्दल सांगणार आहोत. आपण ही लागवड करुन भविष्यात एक चांगली रक्कम कमावू शकता. यासाठी, फक्त थोडा संयम आवश्यक आहे आणि ही तुमच्यासाठी दीर्घ मुदतीची गुंतवणूक असल्याचे सिद्ध होईल. चला या झाडांबद्दल सविस्तर जाणून घेऊया

गम्हार शेती

हे एक वेगाने वाढणारे झाड आहे. भारताशिवाय हे झाड कंबोडिया, म्यानमार, थायलंड इत्यादी परदेशातही हे जास्त उपलब्ध आहेत. त्याची पाने औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. अल्सरसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते.

 

गम्हार लागवडीसाठी खर्च

1 एकरमध्ये 500 रोपे लावली जातात. त्यात एकूण खर्च 40 ते 55 हजारांपर्यंत आहे. कमाईबद्दल बोललो तर या झाडाच्या लागवडीपासून मिळणारे उत्पन्न हे लाकडाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. 1 एकरात लावलेल्या झाडे एकूण एक कोटी रुपये कमावून देतात.

चंदन लागवड

चंदनाचे झाड तयार होण्यास सुमारे 12 वर्षे लागतात. जर आपण 1 रोपे लावले तर ते 5-6 लाख रुपये कमावून देऊ शकते. एक एकरमध्ये 600 रोपे लागवड करता येतील. आता जर तुम्हाला एका झाडापासून 5 लाख रुपये मिळाले तर 15 वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण 30 कोटी रुपये तुमच्या हातात मिळतील. 12 वर्षांत तुमची वार्षिक कमाई 2.5 कोटी असेल. म्हणजेच दरमहा सुमारे 20 लाख रुपये. शेतात जर चंदनाची लागवड करायची असेल तर त्याचे सीडलिंग करावे लागेल. ही एक अतिशय महाग परंतु आवश्यक प्रक्रिया आहे. तसे, आपल्याला 500 रुपयांपर्यंत चंदनाचे झाड मिळेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे म्हणजे चंदनासह आणखी एक वनस्पती लागवड करणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे होस्ट. होस्ट नसल्यास चंदन देखील राहणार नाही.

 

सागवान लागवड

गेल्या कित्येक वर्षांत देशातील जंगलांमध्ये सागवान तोडणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता जंगलांमध्ये या झाडांची संख्या कमी झाली आहे. तर सागवान लाकडाची गुणवत्ता इतकी चांगली आहे की त्याची मागणी दररोज वेगाने वाढत आहे. या लाकडाला कीड लागत नाही कि ते पाण्याने खराब होत नाही. म्हणून, फर्निचर तयार करण्यासाठी या लाकडाचा जास्त वापर केला जातो. सागवानचे लाईफ 200 वर्षांहून अधिक आहे.

 

एकूण खर्च आणि उत्पन्न

सागवानांची 1 एकरावर 400 रोपे लावली जातात. जर आपण सागवानच्या झाडाच्या लागवडीच्या किंमतीबद्दल बोललो तर यामधील एकूण किंमत सुमारे 40 – 45 हजार आहे. त्याच वेळी, जर आपण सागवान झाडामधून होणाऱ्या कमाईबद्दल बोललो तर या झाडाच्या 1 झाडाचे मूल्य 40 हजारांपर्यंत आहे. 400 झाडांपासून 1 कोटींपर्यंत कमाई करू शकता.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters