औरंगाबाद-लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कडकपावले उचलली असून ज्या व्यक्तीने लस घेतली नसेल अशा व्यक्तींना किराणा,मेडिकल आणि दारू मिळणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत.
.रेशन दुकान,ट्रॅव्हल्स, रिक्षा आणि आता दुकाने,मेडिकल स्टोअर्स त्याकडे प्रशासनाने मोर्चा वळविला आहे.तसेच परवानाधारक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये कामगारांची लसीकरणाची किमान एक मात्र पूर्ण झालेली असावी.तसेच ज्या ग्राहकाने कोरोना लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल अशांना या पुढे किराणा,औषध आणि मद्यखरेदी करता येईल.
जर नियमांचे उल्लंघन केले तर अशी दुकाने सील करण्यात येतील असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी 25 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.किराणा दुकाने,इतर उत्पादन विक्री दुकाने व आस्थापना तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट, खानावळी तसेच भोजनालय इत्यादी मध्ये कार्यरत सर्व कर्मचारी,
कामगारांनी लसीकरण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आशा दुकानांमधील कामगारांनी कमीत कमी लसीचा डोस घेतलेलाहवा. जरा कर्मचाऱ्याने लसीचा एक डोस घेतला नसल्याचे आढळून आल्यासदंडात्मक कारवाई म्हणून दुकाने सील करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.
Share your comments