Jalna News : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. या आंदोनलनाने हिंसक वळण घेतल्याने आता जाळपोळीच्या घटना वाढल्या आहेत. मनोज जरांगे यांनी आता दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरु केले आहे. यामुळे त्यांची प्रकृतीच्या काळजी सर्वांना वाटत आहेत. याचदरम्यान मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी हिने ही सरकार सजड दम भरला आहे. माझ्या वडिलांना काय झालं तर राज्यकर्त्यांना घरात घुसून मारेल, अशा इशाराचा पल्लवी जरांगे हिने दिला आहे, असं वृत्त मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
यावेळी पल्लवी म्हणाली की, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ४९ जणांचा जीव गेला आहे तरी आरक्षण मिळाले नाही. आता माझ्या वडिलांचा जीव गेल्यावर आरक्षण मिळणार का? असा सवाल पल्लवीने उपस्थित केला आहे.
पुढे ती म्हणाली की, माझ्या वडिलांना काही झाले तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही. अख्खा मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्त्यांच्या घरात शिरुन त्यांना मारीन. एवढी हिंमत माझ्यात त्यांची मुलगी म्हणून आहे, असंही ती म्हणाली आहे.
दरम्यान, आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन मिळवायचे आहे. मी पप्पांनाही सांगितले आहे की, तुम्ही आंदोलन करा, पण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. मागच्या वेळेस सरकारने विश्वासघात केला. हे लक्षात ठेवा. सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा विषय मार्गी लावावा, असंही पल्लवी म्हणाली आहे.
Share your comments