गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणची शेतकऱ्यांच्या वीज तोडणी कारवाईचा मुद्दा मोठ्या ऐरणीवर होता. यासाठी शेतकरी संघटनांनी मोठा आवाज बुलंद केला होता म्हणून शासनाने तूर्तास वीज तोडणी मोहीम बंद केली आहे. मात्र, महावितरण तीन महिन्यानंतर पुन्हा थकीत शेतपंपाचे वीजबिल वसूल करणार आहे. महावितरणने या कालावधीत शेतकऱ्यांना वीज बिल भरणा करण्याचे आव्हान केले आहे.
तूर्तास जरी शेतकऱ्यांना सवलत दिली गेली असली तरी देखील ही कायमस्वरूपी सवलत नाही. यासंदर्भात आता राजू शेट्टी यांनी एक मोठे वक्तव्य दिले आहे. अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमात शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले की, विजेवर पहिला अधिकार केवळ शेतकऱ्यांचाच आहे कारण की, शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शासनाने सिंचन प्रकल्पाची पायाभरणी केली आहे, याच प्रकल्पातल्या पाण्यातून पुढे शासनाने वीज निर्मिती केली.
यामुळे खरं पाहता पहिला अधिकार बळीराजाचा मात्र, असे असतानाही हक्काची वीज मागण्यासाठी जर भीक मागावी लागत असेल तर हे केवळ अन्यायकारक धोरण आहे. मात्र जे झाले ते झाले यापुढे हा अन्याय सहन केला जाणार नाही असे रोखठोक मत यावेळी राजू शेट्टी यांनी यावेळी मांडले. पुढे बोलतांना शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतपंपासाठी पुरेशी वीज मिळावी यासाठी आगामी काही दिवसात आंदोलन देखील करू. एकंदरीत राजू शेट्टी यांनी आंदोलनाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या हक्काची वीज हीसकवण्याचा इशारा दिला असल्याचे समजत आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकरी स्वाभिमानी संघटनेचा नुकताच एक मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले राजू शेट्टी यांनी यावेळी आपले प्रखड मत व्यक्त केले. राजू शेट्टी यांनी या मेळाव्या दरम्यान पुढे बोलताना सांगितले की, मायबाप शासनाने हमीभावाची घोषणा केली खरी मात्र ती फक्त पांढरा कागद काळा करण्यापुरतीच मर्यादित आहे कारण की, आज देखील व्यापारी शेतकऱ्यांचा माल एकदम कवडीमोल दरात खरेदी करत आहेत.
विदर्भात शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करून त्यावर धरणे बांधली. बांधलेल्या धरणावर पुढे चालून वीज निर्मिती केली. असा विचार करता विजेवर पहिला खरा अधिकार फक्त आणि फक्त शेतकऱ्याचाच आहे. मात्र असे असताना शेतकऱ्यांना शासन दिवसा वीज देण्यास टंगळमंगळ करत आहे. त्यामुळे आगामी 15 दिवसात शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जन आंदोलन करू असा इशारा देखील माजी खासदार आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
Share your comments