1. बातम्या

आधार कार्डमध्ये काही चुकी असेल तर दुरुस्ती होईल मोफत; जाणून घ्या प्रक्रिया

आधार कार्ड हे असे कागदपत्र आहे कि,ते वर्तमान वेळेत प्रत्येक भारतीयांसाठी फार आवश्यक आहे. आधार कार्डला युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया करून लागू करण्यात येते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


आधार कार्ड हे असे कागदपत्र आहे कि,ते वर्तमान वेळेत प्रत्येक भारतीयांसाठी फार आवश्यक आहे. आधार कार्डला युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया करून लागू करण्यात येते. आधार कार्ड धारकाचे नाव, पत्ता, जन्मतिथी, जेंडर आणि बायोमेट्रिक इत्यादी माहिती असते. इतकेच नाही तर आधार कार्ड धारकाचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर त्यामध्ये अंतर्भूत केलेला असतो.

आधार कार्डमध्ये काय काय अपडेट करता येते?

 अशा परिस्थितीत आधार कार्डधारकाकडून काही माहिती चुकीची दिली गेली तर किंवा स्वतःचा राहायचा पत्ता बदलला आहे तर आधार कार्ड धारकांना स्वतःची माहिती अपडेट करावी लागते. या गोष्टींना लक्षात ठेवून युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड आधार कार्ड चे नाव, पत्ता, जन्मतिथी, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, बायोमेट्रिक अपडेट करण्याची सुविधा दिली आहे.

   

तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनही आधार कार्ड अपडेट करू शकता

 यूआयडीएआय तुम्हाला दोन पद्धतीने माहिती अपडेट करण्याचे सुविधा देते. एक म्हणजे ऑनलाइन आणि दुसरे म्हणजे ऑफलाईन. आपल्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड सेंटर ला जावे लागते किंवा बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा माहिती अपडेट केली जाते. तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे नाव, पत्ता, जन्मदिनांक इत्यादी माहिती अपडेट करू शकतात. परंतु ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड केंद्र वरच जावे लागते. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अपडेट होणारी माहिती जसे की, नाव, पत्ता, जन्मदिनांक यासाठी कोणत्याही प्रकारची फीस  द्यायची आवश्यकता नसते. तुम्ही घरी बसून https://ssup.uidai.in/ssup/ वर क्लिक करून या बाबतीतली माहिती अपडेट करू शकता. हे सगळे प्रक्रिया अगदी फ्री आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही.

 काही माहिती अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावे लागते

 तसेच काही कामासाठी तुम्हाला फी द्यावी लागते. जेव्हा तुम्ही बँकेत जाऊन तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, बायोमेट्रिक आणि स्वतःचे छायाचित्र अपडेट करता. तेव्हा तुम्हाला 50 रुपये एवढे नाममात्र शुल्क द्यावे लागते. पोस्ट ऑफिस आणि आधार सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही माहिती अपडेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागते.

English Summary: If there is any mistake in the Aadhar card, it will be repaired free of cost Published on: 28 December 2020, 05:37 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters