आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कांदयाप्रमाणेच लसणाला सुद्धा महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक भाजीमध्ये लसणाचा वापर केला जातो तसेच त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहेत त्यामुळे बाजारात लसणाला वर्षभर मागणी असते. रब्बी हंगामात लसणाची कागवड केली जाते जो की शेतकऱ्यांना यामधून जास्त फायदा भेटतो. परंतु कीड आणि रोगामुळे लसणाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. लसनावर फुलकिडे, पिवळे कोळी या किडी तर तपकीरी करपा, जांभळा करपा, भुरी, कंदकुज या सारखे रोग पडून उत्पादन घटते त्यामुळे योग्य वेळी यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे.
लसणावरील प्रमुख किडी:-
फुलकिडे -
फुलकिडे हे लहान तसेच पिवळ्या तपकिरी रंगाचे असतात जे रस शोषक असल्याने ते मधल्या पोंग्यात राहतात जे की कोवळ्या पातीतून रस शोषला जातो. या फुलकिड्यांनी केलेल्या रस शोषणमुळे त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडतो. फुलकिड्याची वाढ २५ - ३५ अंश सेल्सियस चांगल्या प्रकारे होते.
एकत्मिक व्यवस्थापन...
लसूण लागवड करताना त्यावेळी मका ची लागवड केली तर फुलकिडी चा प्रादुर्भाव कमी होतो तसेच गव्हाची लागवड केली तर ते अधिक फायद्याचे ठरते. तसेच जी नत्रयुक्त खते आहेत त्याचा वापर प्रमाणत करावा. जास्त प्रमाणात नत्र दिले तर कोवळी पात वाढते आणि आणि त्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. लसूण लागवडीपूर्वी किंवा उगवल्यानंतर १० टक्के फोरेट तसेच १० किलो दाणेदार किटकनाशक टाकावे. लसणाची उगवण झाली की त्यानंतर १५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. निंबोळी ची फवारणी करताना सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
पिवळा कोळी:-
पिवळा कोळी ही कीड आकाराने लहान तसेच पिवळ्या रंगाची आणि चपळ असते जी पानातील रस शोषून घेते. या किडीमुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात व लसणाचे कंद पोसत नाहीत. या प्रादुर्भाव दिसताच १५ मिली डायमियोएट 30 ईसी किंवा १० मिली इथिऑन किंवा ३ मिली ॲबामेकटीन किंवा १० मिल डायकोफॉल १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. १० ते १५ दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.
लसणावरील प्रमुख रोग:-
जांभळा करपा -
जांभळा करपा हा बुरशीजन्य रोग असून लसणाच्या पातीवर पिवळा तसेच जांभळा आणि काळपट रंगाचे डाग पडतात जे की जसा जसा प्रादुर्भाव वाढ जातो तशी पात करपायला लागते. या रोगाची वाढीला धुक्यामध्ये तसेच पानावर पडणारे जे द्रव्य असते असे वातावरण अनुकूल ठरते. या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३० ग्रॅम मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी किंवा २० ग्रॅम क्लोरोथॅलोनिल 75 डब्ल्यू पी १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावे.
पिवळसर करपा...
पिवळा करपा रोगाने लसणाच्या पातीवर पिवळे डाग पडतात. या रोगाला वाढण्यासाठी आदरतायुक्त तापमान योग्य ठरते. फुलकिडी चा प्रादुर्भाव वाढला की करपा रोग वाढतो. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३० ग्रॅम डायथेन एम – 45 किंवा १० ग्रॅम कार्बन्डेझिम 50 डब्ल्यू पी प्रति १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावे.
Share your comments