स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी काल (दि.11) रोजी सोलापूर दौऱ्यावर होते. माध्यमांशी संवाद साधत असताना राजू शेट्टी म्हणाले की कारखान्यांनी गेल्या हंगामात इथेनॉल मधून मोठी कमाई केली आहे. सोलापूरसह राज्यातील अनेक साखर कारखान्याचे एफआरपी थकले आहेत. त्यांना गाळप परवाना देऊ नका अशी मागणी साखर आयुक्तालयांकडे करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. त्याचबरोबर यंदाच्या गाळप हंगामात कारखान्यांनी अतिरिक्त ४०० FRP दिली नाही तर,आम्ही कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनीच नाही तर, सर्वसामान्य जनतेने टोल का भरावा असा प्रश्न राजू शेट्टी यांनी त्यावेळी उपस्थित केला . वाहन खरेदी करताना वाहनधारकांना भरमसाठ टॅक्स भरावा लागतो. डिझेलचा भाव पाहिला असता,९५ रुपयांच्या आसपास आहे. हे सरकार डिझेल ३५ रुपयापर्यंत देऊ शकत,पण त्याच्यावर मोठा कर आकारून ९५ रुपयांपर्यंत विक्री करत आहेत.तसेच रस्त्यांवर किती खर्च झाला आणि टोल नाक्यांमधून किती उत्पन्न मिळाले याची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी बच्चू कडू हे सोलापुरात आले होते. त्यांनी शेतकरी प्रश्नांवर बोलताना असे सांगितले की, दुष्काळ जाहीर करण्याऐवजी शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी, यावर राजू शेट्टींनी बच्चू कडूंना प्रतिउत्तर दिले त्यांनी सरकार मधून बाहेर पडावे, भविष्यात आमच्या सोबत यावे, मिळून संघर्ष करू,एक से भले दो त्यामुळे त्यांचे स्वागत करू असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
Share your comments