पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतात.
या योजनेचा दहावा हप्ता एक जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रान्सफर केला.परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हा दहावा हप्ता आलेला नाही.परंतु अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही दहावा हप्ताआलेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर- मार्च चा हप्ता 31 मार्च पर्यंत येत राहील.च्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही दहाव्या हत्या चे पैसे आली नसतील असे शेतकरी 18001155266 या मोबाईल क्रमांक आणि हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून समस्या सोडवू शकतात. असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांची नावे अगोदर होती परंतु नवीन यादी मध्ये त्यांचे नाव नाही असे शेतकरी पी एम किसान चा हेल्पलाइन नंबर 011-24300606 या क्रमांकावर कॉल करू शकतात.
पीएम किसानच्या संदर्भात तक्रार निवारणासाठीचे हे आहेत काही हेल्पलाईन क्रमांक……
- पीएम किसान टोल फ्री क्रमांक-18001155266
- पी एम किसान हेल्पलाइन क्रमांक-155261
- पी एम किसान लँडलाईन क्रमांक-011-23381092,23382401
- पी एम किसान नवीन हेल्पलाइन-011-24300606
- ई-मेल आयडी-pmkisan-ict@gov.in
अशा पद्धतीने तपासा यादीत तुमचे नाव….
- सगळ्यात अगोदर पीएम किसानचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in वर जावे.
- यामध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर हा पर्याय दिसतो.
- फार्मर कॉर्नर या कॉलम मध्ये बेनिफिषरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करावे.
- त्या नंतर ड्रॉप डाऊन लिस्ट मधून राज्य, तुमचा जिल्हा,उपजिल्हा, तालुका आणि गाव निवडावे.
- त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण यादी येते.यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकतात.
Share your comments