1. बातम्या

शंका असेल तर नतमस्तक होऊन आणि हात जोडून चर्चा करण्याची तयारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

KJ Maharashtra
KJ Maharashtra

केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तेवीस दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मध्यप्रदेशातील घेतलेल्या शेतकरी परिषदेत कृषी कायद्याचे समर्थन करताना म्हटले की, जर शंका असेल तर नतमस्तक होऊन, हात जोडून चर्चा करण्यास तयार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आले आहे. कृषी कायदे एका रात्रीतून आले नाहीतर दोन दशकांपासून केंद्र व राज्य सरकारे खाली विविध संघटना यावर मंथन करत होते. मी सर्व राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की तुमची श्रेय तुमच्याजवळ ठेवा. मला श्रेय नको. मी तुमच्या जुन्या जाहिरनाम्यांचा श्रेय देतो. पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या जीवनात मला समृद्धी हवी आहे. कृपया शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सोडा असे ते म्हणाले.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आठ वर्षे दडपून ठेवणाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारावा पंतप्रधान म्हणाले, शेतकरी हिताच्या गोष्टी करणारे लोक किती निर्दयी असतात त्याचा मोठा पुरावा म्हणजे स्वामीनाथन समितीचा अहवाल. त्यांनी या समितीच्या शिफारशींवर आठ वर्षे काहीही कार्यवाही केली नाही. शेतकरी आंदोलन करत होते पण या लोकांच्या पोटातील पाणी हलले नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही फायद्याच्या ढिगार्‍यात घेतलेला स्वामीनाथन समितीचा अहवाल बाहेर काढला आणि त्यातील शिफारशी लागू केल्या. मला असे वाटते की, कृषी कायद्यांमध्ये सुधारणा का केला याचे दुःख त्यांना नाही, तर जे काम आम्ही म्हणत होतो ते आम्ही न करता मोदींनी कसे केले त्याचे दुःख त्यांना आहे. याबाबतचा जाचक यांनी त्यांना विचारावा.


हेही वाचा :नाशिक जिल्ह्यातील हंगामपूर्व द्राक्षांचे दोनशे हेक्टरच्या आसपास नुकसान

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मी शेतकऱ्यांना विश्वासाने सांगू इच्छितो की आम्ही अलीकडील ज्या कृषी  सुधारणा केल्या केल्या त्यात अविश्वासाचे काहीच कारण नाही. आम्हाला किमान हमी दर म्हणजे एम एस पी हटवायचा असता तर स्वामीनाथन समितीचा अहवाल लागू का केला असता? पुढे बोलताना ते म्हणाले की काही शंका असेल तर आम्ही नतमस्तक होऊन अत्यंत विनम्रतेने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters