केंद्र सरकारने खत कंपन्यांना दिले जाणारे अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. जागृती बऱ्याच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने गेल्या वीस तारखेला शेतकऱ्यांना कमी दरात खते उपलब्ध व्हावी यासाठी खत कंपन्यांना अनुदान वाढवून देणारी सूचना जारी केली.
परंतु बऱ्याच भागांमध्ये या केंद्र सरकारच्या सूचनेकडे किंवा आदेशाकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दखल घेत कृषी आयुक्तालयाचे बाजू स्पष्ट केली आहे. अशा समस्याला जर तुम्हाला तोंड द्यावे लागत असेल तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता या बाबतीत माहिती घेऊ.
याबाबतीत तक्रार कोठे करता येईल
दर शेतकऱ्यांची खतांच्या किमतीत बाबत कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर कृषी आयुक्ता लया च्या नियंत्रण कक्षाकडून त्याची दखल घेतली जाईल त्यासाठी शेतकऱ्यांना 8446117500 या मोबाईल क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान तक्रार करू शकता. त्याशिवाय कृषी आयुक्तालयाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 यावर तक्रार करू शकता.
आमच्या संबंधित पंचायत समिती तक्रारीची दखल घेणार
वर आपण पाहिलेल्या दोन क्रमांक शिवाय संबंधित तुमची तक्रार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे देखील करता येईल. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे केंद्र शासनाने सुधारित अन्नद्रव्य आधारित अनुदान जाहीर केले आहे. या सुधारित अनुदानाच्या माध्यमातून स्फुरद अन्नद्रव्याचे अनुदान वाढवण्यात आल्याने स्फुरदयुक्त खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे झालेल्या कमी दरात शेतकऱ्यांनी खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. जर पूर्वीच्या किमतींमध्ये विक्री होत असेल तर आयुक्तालयाच्या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
काही खतांच्या नवीन किमती
डीएपी 50 किलो बॅग – बाराशे रुपये
20:20:0:13 खताची किंमत 975 रुपये
10:26:26 चीक 50 किलो ची किंमत अकराशे 75 रुपये
12:32:16 या खताची किंमत अकराशे 75 रुपये आहे. ( या सुधारित किमती इफको कडून जाहीर आहेत ) इफको ने विक्रेत्यांना कळवले आहे की इफको च्या बॅगे वर जास्त किंमत छापलेले असली तरी त्यांची सुधारित दराने विक्री करावी.
माहिती स्त्रोत= ॲग्रोवन
Share your comments