1. बातम्या

Bank Deposit:आता नो टेन्शन !बँक बुडाली तरी ठेवीदारांना मिळतील पैसे परत

बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या म्हणजे जर एखादी बँक बुडाली तर ठेवीदारांच्या पैशांचे काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता.परंतु आता प्रश्न निकाली निघाला आहे. याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील करोडो बँक खातेदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the bank

the bank

बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या म्हणजे जर एखादी बँक बुडाली तर ठेवीदारांच्या पैशांचे काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता.परंतु आता प्रश्न निकाली निघाला आहे. याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील करोडो बँक खातेदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

ऐका कार्यक्रमाला संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बँकिंग क्षेत्रातील जुन्या कायद्यात सुधारणा करून बँकिंग क्षेत्रातली एक महत्त्वाची व मोठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. अगोदर एखादी बँक बुडाली इतर त्या बँकेत अडकलेली ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत नव्हती. परंतु आता सरकारने ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी बंधनकारक केला आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या अडकलेले पैसे त्यांना 90  दिवसाच्या आत परत मिळतील.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील काही दिवसांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त ठेवीदारांचे अडकलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि जवळजवळ ही रक्कम 1300  कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आज या कार्यक्रमात आणि त्यानंतरही अशा आणखी तीन लाख ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पुढे ते म्हणाले की,अगोदर बँकेत अडकलेली ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळण्यासाठी अनेक वर्षे लागायची. मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला या समस्येचा  फार मोठा सामना करावा लागायचा. 

परंतु आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने बदल आणि सुधारणा केले आहे. आपल्या देशामध्ये बँक ठेवीदारांसाठी विमा प्रणाली 60 च्या दशकात तयार केलीगेली. यापूर्वी बँकेत जमा केलेल्या रकमेची केवळ पन्नास हजार रुपये पर्यंतहमीहोती परंतु आता ती एक लाख करण्यात आली. परंतु आता ही मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. आता कोणतीही बँक अडचणीत आली तरी ठेवीदारांना त्यांचे पाच लाख रुपये नक्कीच मिळतील. यामध्ये सुमारे 98 टक्के खात्यांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे ठेवीदारांचे सुमारे 76 लाख कोटी रुपये पूर्णपणे सुरक्षित आहेत.

English Summary: if any bank go bust but now depositers cash safe till five lakh Published on: 13 December 2021, 07:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters