जळगाव: केंद्र सरकारची प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 चा खरीप हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबवण्यात येत असून 72 तासांच्या आत कृषी विभागाला कळवण्याचे आव्हान करण्यात आलेआहे.
पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत काढणीपश्चात नुकसान या बाबी करता काढणी केलेले पिक कापणीनंतर सुकवण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत म्हणजे 14 दिवसांच्या आत बिगरमोसमी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले असल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून लागू निकषांच्या आधीन राहून नुकसानभरपाई निश्चित केली जाते.
काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल अशा पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या अधिसूचित पिकांचे काळजी नंतर नुकसान झाले असेल तर 72 तासांच्या आत झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम विमा कंपनीसटोल फ्री क्रमांक द्वारे, मोबाईल ॲप द्वारे, ईमेल द्वारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात
किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइन द्वारे देणे आवश्यक आहे असे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.( संदर्भ- लाईव्ह ट्रेंड्स नाऊ))
Share your comments