1. बातम्या

लक्षणातून ओळखा शेळ्यांना होणारे आजार, वाचवा आर्थिक नुकसान

डोंगराळ आणि दुष्काळी भागात शेळीपालन केले जाते. अगदी कमी पैशात भरघोस उत्पन्न देणारा एकमात्र स्रोत म्हणजे शेळीपालन. कमीत कमी जागेत शेळीपालन करता येते. मात्र शेळीपालन करताना एका गोष्टीची दक्षता घ्यावी लागते. शेळी पालन करताना जर आपल्याला अधिक उत्पादन हवे असेल तर शेळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते.

KJ Staff
KJ Staff


डोंगराळ आणि दुष्काळी भागात शेळीपालन केले जाते. अगदी कमी पैशात भरघोस उत्पन्न देणारा एकमात्र स्रोत म्हणजे शेळीपालन. कमीत कमी जागेत शेळीपालन करता येते. मात्र शेळीपालन करताना एका गोष्टीची दक्षता घ्यावी लागते. शेळी पालन करताना जर आपल्याला अधिक उत्पादन हवे असेल तर शेळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला त्याचविषयी सांगणार आहोत. शेळ्यांना कोणत्या प्रकारचे आजार होत असतात. हे आजार कसे ओळखावे.

महाराष्ट्रात मुख्यत: चार प्रकारच्या शेळ्या पाळल्या जातात. उस्मानाबादी, संगमनेरी शेळी, सुरती, कोकण कन्याल या शेळ्या राज्यात पाळल्या जातात. मजूरी, अल्पभधारक, पशुपालनाची आवड असणाऱ्यांसाठी शेळीपालन हा खूप फायदेशीर व्यवसाय आहे. मात्र शेळीपालन करताना शेळ्यांना होणाऱ्या आजाराची काळजी घेतली पाहिजे. हे आजार आपण लक्षणाने कसे ओळखू याची माहिती घेऊ या. जेणेकरून आपले आर्थिक नुकसान होणार नाही.

शेळ्यांमध्ये होणारे आजार कसे ओळखाल

अंत्र विषरक्तता :  या रोगास एन्ट्रोटॉक्सीमिया तर काही ठिकाणी भूल देखील म्हणतात. हा आजार विषाणूमुळे होतो. अचानक खाण्यात होणाऱ्या बदलामुळे किंवा तणावामुळे हा आजार होत असतो. या आजाराची लक्षणे शेळीचे पोट दुखते. शेळी वारंवार उट-बस करते. कृचितप्रसंगी धनुष्याकृती होतो. तर कधी कधी हगवणही होते. या आजाराची रोगबाधा ही प्रमुख तीन ठळक स्वरुपात आढळून येते. अतितीव्र स्वरुप - रोगाचा कालावधी हा २४ तासांपेक्षा ही कमी असतो. बऱ्याच वेळेस हा आजार लक्षात येत नाही आणि शेळ्या दगावतात. तीव्र स्वरुप- लक्षणे सारखीच असतात. पण तीव्रता कमी असते. रोगाचा कालावधी हा ४ दिवासांचा असतो. उपचाराअभावी काही जनावरे मरण पावतात. दीर्घकालीन बाधा- वारंवार कळपातील शेळ्या -मेंढ्या आजारी पडत असतात. प्रौढ शेळ्या यात बळी पडत असतात. वारंवार हगवण होत असल्याने शेळ्यांचे वजन कमी होत असते.

संसर्गजन्य न्यूमोनिया : या रोगाचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतू मध्ये आढळत असतो. याची लक्षणे शारिरिक तापमान वाढलेले असते. श्वास घेण्यास त्रास होतो आणि शारिरिक वजन घटल्यास नाकाद्वारे सतत विसर्ग वाहतो. हा आजार शेळ्यांना झाल्यास आजारी शेळ्यांना कळपातून वेगळे करावे.

सांसर्गिक गर्भपात : हा आजार कॉन्फ्लडेक्टोर लेप्ट्रोप्रोसिस डायस्टेरिया मुळे होत असतो. दुषित खाद्य, पाणी आणि चारा शेळ्यां देऊ नये.

इन्फेक्शस केरेंटायटीस : याला डोळे येणे म्हणतात. जिवाणूमुळे हा आजार होतो.  या रोगाचा पूर्वकाळ सामान्यत २ ते ३ दिवसांचा असतो. शेळ्या आपले डोळे बंद ठेवतात. एक - दोन दिवसात डोळ्याचा मध्यभागी पडदा दिसू लागतो. काहीवेळा डोळा फुटून जातो व अंधत्व येते. २ ते ३ आठवड्यात दृष्टी पूर्ववत होते. आजार कमी करण्यासाठी शेळ्यांना कळपापासून वेगळे करावे.

English Summary: identify goats disease through symptoms Published on: 17 March 2020, 11:30 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters