1. बातम्या

ICL आय सी लीफ पीक सल्लागार हे नवीन तंत्रज्ञान विकसित; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

पुणे: भारतीय शेतीत नवी दिशा देणारे आय सी एलचे संगणकीय क्रांतीकारी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. 10 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. आय सी लीफ ही पर्ण परीक्षण-शिफारस-तांत्रिक मार्गदर्शन या त्रिसूत्रीवर आधारित शेतकऱ्यांना अन्यद्रव्य व्यवस्थापनासाठी अद्यावत अशी ही एक नावीन्यपूर्ण मार्गदर्शन प्रणाली आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
ICL  Corp Consultants developed

ICL Corp Consultants developed

पुणे: भारतीय शेतीत नवी दिशा देणारे आय सी एलचे संगणकीय क्रांतीकारी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. 10 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. आय सी लीफ ही पर्ण परीक्षण-शिफारस-तांत्रिक मार्गदर्शन या त्रिसूत्रीवर आधारित शेतकऱ्यांना अन्यद्रव्य व्यवस्थापनासाठी अद्यावत अशी ही एक नावीन्यपूर्ण मार्गदर्शन प्रणाली आहे.

इस्त्राईल केमिकल्स लिमिटेड आय सी एल च्या माती, पाणी, पर्ण, आणि खत परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून हा नावीन्यपूर्ण आणि अद्यावत उपक्रम आता शेतकऱ्यांचे सेवेत दाखल झाला आहे.

आय सी लीफ या प्रयोगशाळेत अद्यावत एक्स आर एफ (एक्स रे फ्लुरोसन्स) आणि एन आय आर (निअर इन्फ्रारेड स्पेसिट्रोस्कोपी) यासारख्या अद्यावत यंत्राच्या साह्याने पिकांच्या पानांची तपासणी करून विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजणार आहे आणि यावरून पीक सल्लागार च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक अहवाल देण्यात येणार आहे.

पीक सल्लागार अहवालावरून विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता तर निश्चितच दूर केल्या जातील याशिवाय पीक वाढीच्या विविध अवस्थांमध्येय अन्नद्रव्य व्यवस्थापन पिकास हवे तेवढेच द्या जास्त ही नाही कि कमी ही नाही या नुसार अचूकपणे करता येणार आहे. आधीच्या प्रचलित वेट केमिस्टरी पेक्षा या पद्धतीने अचूकपणे व जलदपणे पानातील अन्नद्रव्यांचे निदान व पिकांचे खत व्यवस्थापन करणे आता अतिशय सोपे झाले आहे.

खरंच पानं आपल्याशी बोलू शकतील का? तर निश्चितच या आय सी लीफ च्या माध्यमातून हे आता सहज शक्य झाले आहे. अशी माहिती आय सी एल इंडिया चे प्रमुख शास्त्रज्ञ संजय बिरादार यांनी या वेळी दिली.

शेतकऱ्यांसाठीचे फायदे

१. अचुक वेळेस मार्गदर्शन
२. अचुक तपासणी पद्धती
३. अचुक अन्नद्रव्य व्यवस्थापन शिफारसी
४. कायमस्वरूपी सतत तांत्रिक मार्गदर्शन
५. एकाच ठिकाणी सर्व सेवांचा लाभ
६. अचूक निदान
७. अचूक सल्ला
८. नावीन्यपूर्ण प्रणाली तात्काळ सेवा
९. अद्यावत तांत्रिक माहिती

कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत म्हणाले की, पानांची तपासणी एक्स आर एफ व एन आई आर सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे अचूक पणे करणे आता सहज शक्य झाले आहे. ए आर ओ तसेच सी एफ पी एन च्या तांत्रिक सहकार्याने हे तंत्रज्ञान इस्राईल हुन भारतात आणले गेले हे विशेष.

आधीच्या वेट केमेस्ट्री पेक्षा सुलभ, सोपे, अति जलद आणि अचूकपणे पानांची तपासणी करून विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता समजून घेऊन नेमकेपणाने अन्नद्रव्यांचे/खतांचे व्यवस्थापन करणे आता सहज शक्य झाले आहे.

आय सी लीफ या अद्यावत प्रयोग शाळेचे उदघाटन दापोली कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. डी सावंत, ऍग्रीकलचर रीसर्च ऑरगनायझेशन इस्राईलचे प्रोफेसर उरी येर्मियाहु, सेंटर फॉर प्लॅन्ट नुट्रीशन अँड फर्टीलायझेशन इस्राईलचे डॉ. मेणाकेम असराफ, पीक सल्लागार इस्राईलचे सगी कात्झ

आणि लिरान शमियुल तसेच आय सी एल इंडिया चे CEO तथा प्रेसिडेंट अनंत कुलकर्णी आणि हेड स्ट्रॅटेजि इम्प्लिमेंटेशन अँड डिमांड जनरेशन ओंकार नाथ यांच्या शुभ हस्ते पुणे येथे करण्यात आले. हा कार्यक्रम पुणे येथील सयाजी हाॅटेल मध्ये पार पडला.

कुलगुरू डॉ. के. इ. लवांदे यांनी आय सी एल च्या शेती व शेतकऱ्यांचा कायापालट करणाऱ्या या इस्रायली तंत्रज्ञानाचा फायदा हा आता भारतीय शेतकऱ्यांना होऊन त्यांचे उत्पादन, उत्पादकता व शेतमालाची गुणवत्ता वाढवून अन्नद्रव्यांवरती नेमकेपणाने खर्च करून निव्वळ नफा वाढवता येणार आहे असे नमूद केले.

सगी कात्झ आणि श्री लिरान शम्युएल यांनी क्रॉप ऍडव्हायजर या टूल बद्दल सविस्तर माहिती दिली. आय सी एल द्वारा या कंपनीची स्थापना २०२१ मध्ये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. क्रॉप ऍडव्हायजर च्या माध्यमातून शेतकऱ्यास नेमकेपणाने तसेच आवश्यकतेनुसार खत व्यवस्थापन करता येणे शक्य होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

अनंत कुलकर्णी, सी ई ओ तथा प्रेसिडेंट आय सी एल इंडिया यांनी या वेळी आय सी एल द्वारे चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल तसेच उत्पादनांबद्दल माहिती देऊन याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान या वेळी केले.

ओंकार नाथ हेड स्ट्रॅटेजि इम्प्लिमेंटेशन अँड डिमांड जनरेशन यांनी सर्वांचे स्वागत केले आणि डिजिटल माध्यमातून आणि संगणकीय टूल येणाऱ्या काळात शेती साठी वरदान ठरतील असे मत यावेळी व्यक्त केले. संजय बिरादार प्रमुख शास्त्रज्ञ आय सी एल इंडिया यांनी या वेळी आभार प्रदर्शन केले.

English Summary: ICL IC Leaf Corp Consultants developed this new technology Published on: 14 September 2022, 08:25 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters