आयसीआयसीआय बँकेने शेती क्षेत्राशी संबंधित आपल्या ग्राहकांची पत योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी उपग्रह डेटा ( पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या )डेटा वापरण्याची घोषणा केली आहे. जमीन, सिंचन आणि पिकाच्या नमुन्यांशी संबंधित मापदंडांचे मोजमाप करण्यासाठी हे तंत्र जगातील मोजक्याच बँक वापरात असतात. ICICI बँक ही भारतातील पहिली बँक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न जलद गतीने सोडविण्यास मदत होणार आहे. या उपकरणामुळे जे शेतकरी पात्र आहेत त्यांना मोठी मदत होणार आहे. याव्यतिरिक्त, उपग्रहाच्या साहाय्याने डेटाच्या मदतीने संपर्क पडताळणी पद्धतीने जमीन पडताळणी केली जाणार आहे. व्यावसायिक पद्धतीनुसार १५ दिवसांपर्यंतच्या काळात मूल्यांकन केले जाऊ शकते.
बँक गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील ५०० हून अधिक गावात प्रायोगिक तत्त्वावर उपग्रह डेटा वापरत आहे. आता दोन ते तीन महिन्यांत देशभरातील ६३ हजार पेक्षा जास्त खेड्यांपर्यंत पोहोचतील असे सांगण्यात येत आहे. आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, विज्ञान आणि शेतकऱ्यांशी जोडण्याची वेळ आली आहे. सर्वात आधी, एखाद्याला जमीन, सिंचन पातळी आणि काही मापदंडांचे स्वहस्ते मूल्यांकन करण्यासाठी दुर्गम ठिकाणी जावे लागत होते. शेतकऱ्यांच्या भविष्यातील महसुलाचा अंदाज लावण्यासाठी पीक गुणवत्तेचे नमुने आता पृथ्वी निरीक्षण उपग्रहावरील प्रतिमेमुळे आम्हाला मिळण्यास मदत होते. संपर्क नसलेल्या आणि अत्यंत दुर्गम्य भागाची माहिती मिळविण्याची ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे .
बँकेकडून असे सांगण्यात आले कि, जे शेतकरी या मूल्यांकावरून आर्थिक सहाय्य घेण्यास पात्र आहेत. त्यांना या उपक्रमामुळे फायदा होईल हे निश्चित आहे पण भविष्यात सुद्धा जे शेतकरी इच्छुक असतील त्यांना सुद्धा याचा लाभ मिळेल. कृषि-फिन्टेक कंपन्यांकडे बँकेने भागीदारी केली आहे, यामुळे तंत्रज्ञान आणि हवामान संबंधी प्रश्न सुद्धा सोडविण्यास मदत होणार आहे.
Share your comments