राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे हे जवळपास ५० आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे गेले होते. विधान परिषदेची निवडणूक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आणखी काही आमदारांनी बंडखोरी केल्याचे वृत्त धडकले आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक गोष्टी घडल्या.
काल शिंदे सरकारने बहुमताचा ठराव देखील जिंकला, यावेळी सर्व बंडखोर आमदर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे विधानभवनाकडे मार्गस्थ होत असताना वाटेत बंडखोर आमदार प्रकाश सूर्वे यांची भेट झाली. आता यांना काय बोलणार असे म्हणत त्यांनी संवादाला सुरवात केली. त्यादिवशी जेवण तयार ठेवलेले आम्ही तुमच्याकडे येत होतो. असे कराल अपेक्षित नव्हतं. तुमच्यावर खरोखर प्रेम होते, हे तुम्हाला देखील माहिती होते, असे आदित्य ठाकरे त्यांना म्हणाले.
तसेच ठीक आहे, बघा आता विजयी करा पण मला स्वत:ला दुख झाले. हे तुम्हाला पण माहिती आहे. असा संवाद ते साधत असताना सूर्वे केवळ मानेने होकार देत होते. हा संवाद काही क्षणापूरता झाला असला तरी भावनिक होता, यावेळी आमदार काहीच बोलू शकते नाहीत. यामुळे याची विडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केले असले तरी त्यापैकी 20 आमदार परत येतील असा विश्वास आदित्य ठाकरे हे नेहमी करीत होते.
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..
आमदारांसोबत केलेले काम आणि रोजचा संबंध यामुळे त्यांना ते वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे काही झालेच नाही. असे असताना मात्र बंडखोर हे आपल्या डोळ्यात-डोळे घालून बोलू शकणार नाहीत हे त्यांचे वाक्य खरे झाले. त्यांच्या संवादावरून तर तसेच दिसून आले. आमदार प्रकाश सूर्वे यांचा चेहरा मात्र खूपच पडला होता. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..
शिंदे सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पेट्रोल डिझेल होणार स्वस्त..
बंडखोर म्हणत होते अजितदादा निधी देत नव्हते, दादांनी सगळ्यांसमोर आकडेवारीच सांगितली
Share your comments